मुंबई : दाट धुक्यामुळे सलग दुस-या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे.  यामुळे वाशिंद रेल्वे स्थानकात प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केलंय. लोकल उशिरा असल्याने प्रवासी संतप्त झालेत. सकाळी पावणे सातपासून लोकल वाहतूक ठप्प आहे. त्यातच लांब पल्ल्याची रेल्वे पुढे सोडल्याने प्रवाशांचा संतापाचा उद्रेक झालाय. 


शुक्रवारीसुद्धा मध्य रेल्वेची वाहतूक धुक्यामुळे उशिराने होती. आज सकाळपासून १५ ते २० मिनिटे लोकल उशिरा असल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.  महिन्याचा दुसरा आठवडा असल्यामुळे अनेकांना सुट्टी असली तरीही काही प्रवाशांना याचा फटका बसला आहे. 


शनिवारी मुंबईकर मस्त थंडीचा आस्वाद घेत आहेत. मुंबईत सर्वत्र फॉगी वातावरण असल्यामुळे नागरिकांमध्ये एक चांगलाच उत्साह देखील पाहायला मिळत आहे.