मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेवर दर रविवारी विविध (Mumbai Local Mega Block) कामानिमित्ताने मेगाब्लॉक घेतला जातो. त्यामुळे मध्य आणि पश्चिम मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जातो. रविवारी 19 जूनला मध्य मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडणार असाल तर वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा. तर दुसऱ्या बाजूला पश्चिम मार्गावरील प्रवाशांसाठी रेल्वेने गूड न्यूज दिली आहे. (mumbai local mega block 19 june 2022 mega block on central and harbour line) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेवर रविवारी ठाणे - कल्याण 5व्या आणि 6व्या मार्गावर सकाळी 9 ते दुपारी 1पर्यंत मेगाब्लॉक आहे. या काळात काही एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग वळवण्यात येणार आहेत.  


तर कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी4.10 पर्यंत ब्लॉक असेल. या वेळेत सीएसएमटीकडे जाणा-या अप हार्बर मार्गावरची सेवा रद्द राहील. 


एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ


पश्चिम रेल्वेवर आणखी एसी लोकलच्या 8 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत .यामुळे सोमवार ते शुक्रवार पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 40 फेऱ्या होणार आहेत. पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 8 फेऱ्या वाढणार.


मध्य रेल्वे मार्गावर 18 आणि 19 जूनच्या एक्सप्रेस रद्द 


दरम्यान मध्य रेल्वे मार्गावर 18 आणि 19 जूनच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.  ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनामुळे रेल्वेने काही एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. 


रद्द करण्यात आलेल्या गाड्या 


-12149 - पुणे-दानापूर एक्सप्रेस जेसीओ 18 जून


- 12111 लोकमान्य टिळक टर्मिनस - पाटलीपुत्र एक्सप्रेस जेसीओ 18 जून


-11061 लोकमान्य टिळक टर्मिनस - जयनगर एक्सप्रेस जेसीओ 19 जून


-13202 लोकमान्य टिळक टर्मिनस - पाटणा एक्सप्रेस जेसीओ 19 जून