Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी (Mumbaikar) महत्त्वाची बातमी...जर तुम्ही देवीच्या दर्शनासाठी घराबाहेर पडणार असाल तर पहिले हे माहिती करु घ्या. मुंबईमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी मुंबई लोकलचा (Mumbai Local) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जर तुम्ही आज लोकलने प्रवास (local Travel) करण्याचा विचार करत असाल तर पहिले लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या. कारण रविवारी रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही मध्य आणि हार्बर (Harbour Line Mega Block)  मार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला तो त्रासदायक ठरणार आहे. कारण या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. तर पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरील लोकांसाठी मात्र दिलासा आहे. (Mumbai Local Mega Block 2 october nmp)


मध्य रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक (Central Line Mega Block) 


- माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. 
-  ठाण्याच्या पुढे जलद असलेल्या या लोकलसेवा मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.
- ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील लोकलसेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. 


हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक (Harbour Line Mega Block) 


-पनवेल- वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत (नेरुळ/बेलापूर-खारकोपर लाईन वगळून) मेगाब्लॉक 
- पनवेल/बेलापूर येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/गोरेगावकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द 
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
- पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याकरता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणेकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द 
- मेगाब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. 
- ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर रेल्वे सेवा उपलब्ध असेल. 
- ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ – खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. 
-हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेनलाइन आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.