Mumbai Local Update : मध्य रेल्वेच्या 63 तासांच्या मेगाब्लॉकला अद्यापही काही तास उरले आहेत. अद्यापही मेगाब्लॉक पूर्ण झाला नसला तरीही प्रवाशांची संख्या मात्र कमी होत नसल्यामुळं वाहतुकीच्या इतर साधनांवर याचा ताण येताना दिसत आहे. काही प्रवाशांना अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठी रेल्वेव्यतिरिक्त इतर पर्याय नसल्यामुळं खोळंबा अपेक्षित असतानाही अनेकांनी रेल्वे स्थानकाची वाट धरली. काहींना या ब्लॉकची कल्पना नसल्यामुळं अशा प्रवाशांचाही या परिस्थितीमुळं खोळंबा होताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेच्या या ब्लॉकमुळं सध्या ठाणे आणि त्यापुढील स्थानकांवर प्रचंड गोंधळाची स्थिती पाहायला मिळत आहे. शनिवारी सकाळच्याच वेळी दिवा स्थानकाच तुडूंब गर्दी पाहायला मिळाली. दिवा स्थानकातून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमध्ये ही गर्दी पाहायला मिळाली. इथं गर्दी असल्यामुळं रेल्वेचा दरवाजा बंद करण्यात आला होता, पण प्रवाशांनी हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला आणि तिथं एकच आरडाओरडा झाला. 



पाचशेहून अधिक लोकल रद्द 


मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी आणि ठाणे दरम्यान ब्लॉक काळात रेल्वे प्रवाशांनी गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक असेल तरच रेल्वे प्रवास करावा. शक्य असल्यास रेल्वे प्रवास टाळावा असं स्पष्ट आवाहन करताना रेल्वे प्रशासनानं स्पष्ट सांगितल्यानुसार शनिवार आणि रविवारी  सुट्टीच्या दिवसांच्या वेळापत्रकानुसार लोकल धावणार आहेत. परिणामस्वरुप 534 लोकल आणि 37 मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.