Mumbai Local News : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्काळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे. बोरिवली - दहिसरदरम्यान एसी लोकल बंद पडली. त्यामुळे अनेक गाड्यांना उशिर झाला. दरम्यान, ओव्हर हेड वायर तुटल्याने एससी लोकलचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने ही  लोकल मध्येच बंद पडली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी पुढचे स्टेशन पायी जात गाठले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईकरांना पश्चिम रेल्वेवर आज मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे पाहायला मिळाले. अर्धा तास लोकल सेवा ठप्प असल्याने कडक उन्हात प्रवाशांना रेल्वे रुळावरुन जावे लागले. ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यानं विरारकडून चर्चगेटच्या दिशेने जाणारी एसी लोकल मध्येच बंद पडली. बोरिवली ते दहिसर स्टेशनदरम्यान एसी लोकल बंद पडल्याने कामावर जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. अखेर प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरुन चालत पुढचं स्टेशन गाठले. मात्र यामुळे वाहतुकीवरही परिणाम झालेला पाहायला मिळाला.


 



दरम्यान, मध्य, पश्चिम आणि उपनगरीय  रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी घराबाहेर पडण्यापूर्वी बदलेले वेळापत्रक पाहून बाहेर पडा. अपेक्षित ठिकाणी, अपेक्षित वेळेत पोहोचण्यासाठी तुम्हीही दर दिवशी धडपड करत असाल. तर Mumbai Local बाबतची मोठी बातमी वाचा. नव्या माहितीनुसार लोकलच्या वेळापत्रकांत काही मोठे बदल करण्यात आल्यामुळं काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेवरील कर्जतच्या यार्डमध्ये बदल करण्यासाठी काही कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे कर्जत ते खोपोली घाटदरम्यान पुढील तीन दिवस मध्य रेल्वेन ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉक कालावधीत दोन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.