Mumbai Local: आज लोकलने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा!
Mumbai Railway News : आज तुम्ही मुंबईच्या दिशेनं येण्याजाण्याचा बेत आखत असाल किंवा मुंबई लोकलमार्गे प्रवास करण्याचा बेत आखत असाल, तर तुम्हाला पूर्वनियोजन करावं लागणार आहे. कारण रेल्वेकडून आज (11 डिसेंबर) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mumbai local train news Mega Block latest Marathi news )
Mega Block on Sunday, December 11, 2022: रविवारी तुम्हीही मुंबईच्या (mumbai news) दिशेनं येण्याजाण्याचा बेत आखत असाल किंवा मुंबई लोकलमार्गे (mumbai local) प्रवास करण्याचा बेत आखत असाल, तर तुम्हाला पूर्वनियोजन करावं लागणार आहे. कारण उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी (11 डिसेंबर 2022) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक (railway megablock) घेण्यात येणार आहे. (Mumbai local train news Mega Block latest Marathi news )
मध्य रेल्वेच्या (central railway) ठाणे ते कल्याण पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर तर हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते वांद्रे मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान धीम्या मार्गावर मेगाब्लॉक (megablock news marathi) असणार आहे. मध्य रेल्वेवरी ब्लॉक सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ज्यामुळं वाहतुकीवर याचे परिणाम होणार आहेत.
कोणत्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांवर याचा परिणाम होणार?
हटिया-एलटीटी एक्स्प्रेस, हजूर साहिब नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, 13201 पाटणा-एलटीटी एक्स्प्रेस, काकीनाडा-एलटीटी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई एक्स्प्रेस, कोईम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस या गाड्या कल्याण - ठाणे स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहेत. परिणामी त्याच्या निर्धारित वेळेनुसार त्या 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. तर काही मेल-एक्स्प्रेस गाड्या थेट दुसऱ्या मार्गाने वळवण्यात येणार आहेत.
वाचा: पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचं लोकार्पण, जाणून घ्या वैशिष्ट्यं
हार्बर रेल्वे
चुनाभट्टी ते वांद्रे हार्बर मार्गावर (harbour railway) सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ज्यामुळं ब्लॉकच्या वेळेत सीएसएमटी आणि वडाळा रोड येथून वाशी/ बेलापूर/ पनवेलकडे आणि सीएसएमटीहून वांद्रे/ गोरेगावकडे जाणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द असेल.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीच्या दिशेनं जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएमएमटी मार्गे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा ठप्प राहील. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
पश्चिम रेल्वे
तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव धीम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान धीम्या मार्गावरील सर्व उपनगरीय लोकल सेवा बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येईल. तसंच या ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन दिशेच्या काही उपनगरीय लोकल सेवा रद्द असणार आहेत.