Mumbai Local News : इथे पाऊस धुमाकूळ घालत असतानाच तिथे रेल्वे वाहतुकीवरही याचे परिणाम होताना दिसत आहेत. त्यातच सुट्टीचा वार म्हणून रविवारी तुम्ही कुठं बाहेर जाण्याचा बेत आखत असाल तर, या माहितीकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका. कारण, मुंबई रेल्वे मार्गावर 30 जुलै 2021 रोजी मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल सुरु राहतील तर, ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध राहतील. ब्लॉकदरम्यान बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील. (Mumbai local news mega block latest updates)


मध्य रेल्वेकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार विविध तांत्रिक आणि देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक परीचालीत करण्यात येणार आहे. यामध्ये ठाणे- कल्याण पाचव्या आणि सहाव्या लाईनवर सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान लांब पल्याच्या अप मेल आणि डाउन मेल/एक्सप्रेस गाड्यांचेही मार्ग वळवण्यात आले आहेत. परिणामी या गाड्यांच्या वाहतुकीच साधारण 10 ते 15 मिनिटांचा उशिरही अपेक्षित आहे. 


कोणत्या रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम? 


• ट्रेन क्रमांक 12134 मंगळुरु-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  एक्सप्रेस
• ट्रेन क्रमांक 13201 पाटणा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
• ट्रेन क्रमांक 17221 काकीनाडा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
• ट्रेन क्रमांक 12321 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  मेल
• ट्रेन क्रमांक 12812 हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
• ट्रेन क्रमांक 11014 कोईम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 12126 पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  प्रगती एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 11010 पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस


हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain : विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला 'यलो अलर्ट'; आताच पाहून घ्या हवामानाचा अंदाज 



• गाडी क्रमांक  17611 नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  राज्यराणी एक्सप्रेस
• ट्रेन क्रमांक 12124 पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  डेक्कन क्वीन
• ट्रेन क्रमांक 22160 चेन्नई-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  एक्सप्रेस
• ट्रेन क्रमांक 12168 बनारस-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस


डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. इथंही खालील गाड्यांना 15 मिनिटांचा उशिर अपेक्षित आहे. 


• ट्रेन क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर एक्सप्रेस
• ट्रेन क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनथपुरम नेत्रावती एक्सप्रेस
• ट्रेन क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कोल्हापूर एक्सप्रेस
• ट्रेन क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस


हार्बर मार्गावरी वाहतुकीविषयी सांगावं तर, पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील रेल्वे गाड्या रद्द राहतील. तर, पनवेलहून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत  सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाण्याहून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल दिशेनं जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहील.