रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेतला आहे. हा मेगाब्लॉक माटुंगा - ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक सकाळी 11.05 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत असणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरून सुटणारी आणि सीएसएमटीकडे येणारी अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा - ठाणेदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे या लोकल विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर या स्थानकात थांबणार नाहीत.


हार्बर मार्गावर असा असेल मेगाब्लॉक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सीएसएमटी - चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत सीएसएमटी, वडाळा रोड ते वाशी, बेलापूर, पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी - वांद्र,गोरेगाव अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल - कुर्लादरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करता येणार आहे.


पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक 


बोरिवली-गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हा मेगाब्लॉक सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. ब्लॉक कालावधीत बोरिवली - गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार असून काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. अंधेरी आणि बोरिवली लोकलला हार्बर मार्गावरून चालवण्यात येईल. तसेच बोरिवली फलाट क्रमांक 1 ते 4 वरून धावेल.


गर्डरच्या उबारणीचा परिणाम


पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मरिन लाइन्सदरम्यान वानखेडे पादचारी पुलाच्या मुख्य गर्डरची उभारणीसाठी शनिवारी रात्री 1.10 ते पहाटे 4.10 वाजेपर्यंत तीन तासांचा ब्लॉक असल्याने अनेक लोकल अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. रात्री 11.49  ची विरार - चर्चगेट, रात्री 12.05ची विरार - चर्चगेट, रात्री 12.30 ची बोरिवली - चर्चगेट, रात्री 12.10 ची बोरिवली - चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रलपर्यंत तर पहाटे 4.15 ची विरार आणि 4.18 ची बोरिवली मुंबई सेंट्रलवरून सुटेल. रात्री 11.30 ची विरार - चर्चगेट शेवटची लोकल असेल.