Viral Video : `हे अश्लील चाळे थांबवा`! दिल्ली मेट्रोनंतर, आता मुंबई लोकलमध्ये तरुणीचा बेली डान्स
Mumbai Local Train Video : दिल्ली मेट्रोनंतर आता मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणीचा अश्लील डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून मुंबईकर संतापले आहे.
Mumbai Local Train Video : दिल्ली मेट्रोमधील कपलचे अश्लील चाळ करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर दिल्ली मेट्रो प्रशासनाने अनेक वेळा इशारा देऊनही कपलचे अश्लील कृत्य संपले. त्यामुळे दिल्ली मेट्रो बदनाम झाली आहे. पण हे काय मुंबई लोकल ट्रेनमधील एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुंबई लोकल म्हटलं की, डोळ्यांसमोर तुफान गर्दी आणि सीट पकडण्यासाठी धावपळ... आपली मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांचा श्वासच...इथे अख्ख एक आयुष्य मुंबईकर जगत असतात. या लोकल ट्रेनमध्ये बाप्पाचं प्राणप्रतिष्ठापना केली जाते. भजन, किर्ती अगदी तरुणाई गाणी गात प्रवास करतात. तर महिला डब्यातील दृष्य तर निराळीच असतात. इथे भाजी निवडण्यापासून हळदी कुंकू, वाढदिवस, ओट भरणी अगदी नवरात्रात गरबादेखील खेळला जातो. (mumbai local train blue dress girl belly dance video viral on Internet top trending news)
मुंबई लोकल ट्रेनचं नाव घेतलं की, सोशल मीडियावरील महिला डब्यातील सीटवर त्यांची तुफान हाणामारीचे व्हिडीओ डोळ्यांसमोर येतात. पण हे काय यंदा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तरुणीचं अश्लील कृत्य पाहून मुंबईकर संतापले आहेत.
मुंबई लोकल ट्रेनमध्ये निळा कपड्यांमध्ये तरुणी बेली डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ ट्रेंडिंग असून हा अश्लिल डान्स त्वरीत थांबवा आणि त्या तरुणीवर कारवाई करा अशी मागणी जोर धरतेय.
हल्ली सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी काही तरी हट्टे करण्याच्या नादात मर्यादा सोडून अनेक जण अशा प्रकारचे रील्स आणि व्हिडीओ बनवले जातात. पण इन्फ्लुएंझर्सनं दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओचा परिणाम देखत मुंबई लोकल ट्रेनमध्ये असं कृत्य करण्याची हिम्मत केली आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्वीटर म्हणजे X वर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवरील gallinews_com या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.