Local Train Dog Video: लोकल ट्रेन ही मुंबईकरांची (Mumbai News) लाईफलाईन आणि रक्तवाहिनी म्हटली जाते. दररोज लाखो प्रवाशी लोकलने (Local Train) प्रवास करतात. लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्याना दररोज नवनवीन अनुभव येत असतात. लोकल ट्रेनमधील असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही भावना दाटून येतील. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होताना दिसतोय. (Mumbai Local Train Dog Charlies journey Video Have you seen it marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकल ट्रेनच्या गर्दीत एक तरुण पाठीवरच्या बॅग मधून एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू (puppy dog) घेऊन जात आहे. हा करून बॅग मांडीवर घेऊन बसला आहे. हळूच या बॅगमधून कुत्र्याचं पिल्लू बाहेर डोकावताना दिसत आहे. ट्रेन मधील सहप्रवाशी या कुत्र्याच्या पिलाकडे कौतुकाने आणि कुतूहलाने पाहतांना दिसत आहेत.


पाहा Video - 



व्हायरल झालेला (Trending Video) हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये दिसतोय. पहिल्या भागात कुत्र्याचं पिल्लू तरुणाच्या बॅगमध्ये सुखाची झोप घेताना दिसतोय. तर दुसऱ्या भागात पिल्लू झोपेतून उठून बॅगेच्या बाहेर येताना दिसतंय. गोंडस कुत्र्याच्या पिल्लाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलाय. मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर केला जातोय.


आणखी वाचा - Bus Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस झाली पलटी; भीषण अपघाताचा Video समोर!


दरम्यान, मुंबईकरांची लोकल (mumbai local) आणि दिल्लीकरांच्या मेट्रोतील (Delhi Metro)  एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) पाहिला मिळतात. रील्स (Reels) बनवण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढतं आहे. यातून रातोरात अनेक जण प्रकाशझोतात येतात. तसेच सध्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.