Video : मुंबई लोकलमध्ये `थप्पड युद्ध`! महिलांनी एकमेकींच्या वेण्या ओढत धावत्या ट्रेनमध्ये केला तुफान राडा
Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकल ट्रेनचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये महिलांनामध्ये तुफान हाणामारी होताना दिसत आहेत.
Mumbai Local Train Video Viral : मुंबई लोकल ट्रेन ही मुंबईकरांची श्वास आहे. तिच्याशिवाय जगणं मुंबईकर विचार करु शकतं नाही. मुंबई आणि उपनगरात प्रवास करण्यासाठी हे सर्वात जलद, स्वस्त आणि उपयुक्त असं साधन आहे. त्यामुळे कायम मुंबई लोकल ट्रेन प्रवाशांनी खचाखच भरलेली असते. मुंबई लोकल ट्रेनचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. त्यांचा जीवघेणा प्रवास असो किंवा या लोकल ट्रेनमधील त्यांची दुनिया असो. (Mumbai Local Train ladies figh Video Viral Social Media Trending News)
पण या लोकल ट्रेनमधील महिला डब्ब्यातील एक घटना वारंवार होता ना दिसते ती म्हणजे या डब्ब्यात होणारी महिलांची हाणामारी...कोणत्या ना कोणत्या कारणावरून महिलांमध्ये वादविवाद होतात. काही वेळा हे वाद एवढे वाढतात की, त्यांच्यामध्ये हातापायी होते. सध्या सोशल मीडियावर असाच मारामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये धावत्या ट्रेनमध्ये महिलांनी महिला डब्बाला कुस्तीचा आखाडा केला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शाब्दिक बाचाबाची अखेर थप्पड युद्धावर जाते.पहिल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका काकूने रागाच्या भरात महिलेच्या कानाखाली मारली आहे. पण काकूच्या वयाचा विचार करु ती महिला आपल्या जागेवर शांतपणे बसते. पण ती काकू तिला खरंखोट ऐकवतं. त्या दोघींची बाचाबाची डब्यातील इतर महिला पाहत असतात.
तरदुसऱ्या व्हिडीओमध्ये थप्पड युद्ध पाहिला मिळाले. दोन महिलांमध्ये काही मुद्द्यावरून मतभेद झाल्याचे पाहायला मिळतं. हा संघर्ष इतका वाढला की त्यांनी एकमेकांच चीरहरण केल. धावत्या ट्रेनमध्ये या महिलांनी लोकल ट्रेनमधील महिला डब्याला कुस्तीचा आखाडाच केला.
तुम्ही पाहू शकता हा डबा महिला प्रवाशांनी खचाखच भरलेला आहे. बसायला देखील जागा नाही, अशात काही महिला आणि तरुणी दरवाज्याजवळ उभ्या आहेत. हे युद्ध महिला एसी डब्याच्या बाजूला असलेल्या महिला डब्यात घडलं.
या व्हिडीओमध्ये क्रिम रंगाचा ड्रेस घातलेली तरुणी पिवळ्या रंगाच्या महिलेशी भांडताना दिसत आहे. तरुणी त्या महिलेच्या हातावर मारते. आपल्याला मारलं म्हणून महिलेला अजून जोर येतो आणि ती तरुणीचे केस पकडून तिला मारायला लागते.
महिला डब्यातील इतर महिला त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ही भांडणं कशावरुन झाली ते समजू शकलेलं नाही. पण कधी जागेवर, तर निव्वळ धक्का लागला म्हणून अशा क्षुल्लक कारणावरुन होताना दिसतात.
हे व्हिडीओ मुंबई Matters या ट्वीटर म्हणजे X वर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही व्हायरल होतो आहे.