मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसा-याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार वाशिंद आणि आसनगावदरम्यान मालगाडीत बिघाड झाला आहे. तासभरापासून कसा-याकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. आता मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. 


लोकल रेल्वे उशिराने होत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळी झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.