Mumbai Local News Today: तिकिटासाठी रांगेत ताटकळत उभं राहण्याची आता गरज नाहीय. रेल्वेने एक महत्त्वाचे पाऊल उचललं आहे. रेल्वेने युटीएस अॅपमध्ये बदल केले आहेत. त्यामुळं आता प्रवाशांना रांगेत उभं न राहताही प्लॅटफॉर्मवरच लोकलचे तिकिट काढता येणार आहे. रेल्वेने केलेल्या या बदलामुळं अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी रेल्वेने हा बदल केला आहे. मुंबईसारख्या दाट लोकवस्ती असलेल्य शहरांतील नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेल्वे ही देशाची लाइफलाइन आहे. रेल्वेतून प्रवास करायचा म्हणजे कन्फर्म तिकिट असायलाच हवे. साधारणतः मोठ्या स्थानकांत तिकिटघरांत तिकिटांसाठी मोठी रांग लागलेली असते. प्रवाशांना तिकिट काढणे सोप्प व्हावे, यासाठी रेल्वेने युटीएस अॅपमध्ये बदल केले आहेत. त्यामुळं लोक आरामात तिकिट काढू शकणार आहेत. रेल्वेने अनारक्षित तिकिट काढण्यासाठी युटीएस अॅप डेव्हलप केले आहे. जेणेकरुन रांगेत उभं न राहताना जनरल तिकिट आणि प्लॅटफॉर्म तिकिट काढता येऊ शकणार आहेत. प्रवासी महिन्याचा पासदेखील काढू शकतात. मात्र, सुरुवातीला तिकिट काढण्यासाठी काही मर्यादा होत्या. रेल्वे रूळांपासून 20 मीटर दूर असतानाच तिकिट काढू शकता यायचे. मात्र, आता रेल्वेने ही मर्यादा शून्य केली आहे. 


रेल्वेने युटीएस अॅपवर तिकिट काढण्यासाठी संपूर्ण देशातील रेल्वे रूळांसाठी जिओ फेसिंग केली आहे. कारण लोक ट्रेनमध्ये चढल्यानंतर टीटीला बघून तिकिट काढू शकतात. त्यामुळं रेल्वे रूळांपासून 20 किमी अंतरावर असताना अॅपमधून तिकिट काढण्याची मर्यादा होती. मात्र आता त्यात बदल करुन ही मर्यादा शून्य केली आहे. म्हणजेच प्लॅटफॉर्म उभं राहूनही तुम्ही तिकिट काढू शकता. त्यासाठी तुम्हाला स्थानकाच्या बाहेर जावं लागणार नाही. 


अनारक्षित तिकिट काढण्यासाठी युटिएस अॅपमधून तिकिट काढण्यासाठी तुम्हाला युटीएस अॅप डाउनलोड करावं लागेल. हे अॅप अँड्रोइड आणि IOS प्लॅटफॉर्मवरुन डाइनलोड करु शकतात. जर तुमच्याकडे अँड्रोइड फोन आहे तर प्ले स्टोअर मधून हे अॅप डाउनलोड करु शकता. युटीएस अॅपमधून तिकिट काढताना दोन पर्याय आहेत. पहिला पेपरलेस म्हणजेच अॅपमधूनच तुम्ही टीटीला तिकिट दाखवू शकता. तर, दुसरा पर्याय प्रिंटेड तिकिट त्यासाठी तुम्हाला अॅपमधून रेल्वे स्थानकात लावलेल्या ऑटोमॅटिक वेंडिग तिकिटमधून पेपर तिकिट प्रिंट करु शकतात. 


मुंबईसारख्या शहरांसाठी युटिएसमधील हा बदल मोठा दिलासादायक ठरणार आहे. हजारो लोक या अॅपवर अवलंबून आहेत. सध्या 25 टक्के लोक युटिस अॅपवरुन तिकिट घेतात. आता या बदलामुळं युटिएस अॅपचा वापर आणखी वाढणार आहे.