Mumbai Local Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडिओ हे खुपच मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओत मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मुंबईच्या लोकलचे (Mumbai Local) प्रवासी महिला टीटीईचं कौतूक करतातय. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : Google मध्ये नोकरीसाठी तरूणाने तयार केलं क्रिएटीव्ह Resume, Photo व्हायरल 


व्हिडिओत काय?


हा व्हिडिओ लोकल ट्रेनमधला (Mumbai Local Train) आहे.या लोकलमध्ये भरगच्च गर्दी जमली आहे, अक्षरशा पाय ठेवायलाही जागा नाही आहे. मात्र तरीही एक महिला टीटीई (Lady TTE) धाडस करून या ट्रेनमध्ये चढते आणि प्रवाशांचे पास आणि तिकीट चेक करू लागते. काही प्रवाशांना ही गोष्ट खटकतेय, कारण पायही ठेवणाऱ्या जागा नसणाऱ्या गर्दीत तिला पास अथवा तिकिट कसा दाखवणार. तर काही प्रवासी तिच्या कामाचे कौतूक करत आहेत.


व्हायरल का होतेय? 


ही महिला टीटीई (Lady TTE) सोशल मीडियावर व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे, तिची तिकीट चेक करण्याची वेगळी शैली. कारण व्हिडिओत तुम्ही पाहू शकता जेव्हा ती तिकीट चेक करते त्यानंतर ती प्रत्येकाला गॉड ब्लेस यु असे म्हणत पुढे जाते. एखादा मुस्लिम प्रवासी असेल तर त्याला सलाम वालेकुम, पंजाबी पगडीतला प्रवासी असेल तर त्याला सतश्रीयाकाल म्हणत आदराने वागवत आहे. त्यामुळे या तिच्या वेगळ्या शैलीमुळे ती सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. 



दरम्यान मुंबई मॅटर्स या ट्विटर अकाउंटवर तिचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय. अनेकजण तिच्या कामाचे कौतूक करत आहेत. या व्हिडिओची सोशल मीडियावर (Social Media) चर्चा आहे.