Mumbai Viral Video: मुंबई लोकलमध्ये ही महिला माईक घेऊन गाते गाणं, कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
Women Singing in Mumbai Local Train: मुंबई लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या लाखो चेहऱ्यांमध्ये असे चेहरे असतात जे कायमचे लक्षात राहातात.
Women Singing in Mumbai Local Train: मुंबई रेल्वे लोकल (Mumbai Railway Local) म्हणजे लाखो चाकरमान्यांची जीवनवाहिनी. नोकरी-व्यवसायानिमित्ताने दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. लोकलमध्ये दैनंदिन प्रवास करणाऱ्यांचं रक्ताचं नसलं तरी भावनिक नातं तयार होतं, अनेक सुख:दु:खाचे प्रसंग एकमेकांशी आदान-प्रदान केले जातात. भजन मंडळींच्या ग्रुपने लोकलमधला प्रवास कसा निघून जातो हे कळतंच नाही. काही वेळा लोकलमध्ये अगदी छोट्याशा कारणानेही भांडणं होता, आणि प्रकरण हाणामारीपर्यंत जातं. पण काही घटना अशा असतात ज्या आपल्या आयुष्यावर कायमच्या कोरल्या जातात.
मुंबई लोकलमधील तो व्हिडिओ व्हायरल
सध्या मुंबई लोकलमधला असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. या born2convey नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आला आहे, यासोबत त्याने एक कॅप्शन दिलं आहे. त्यात त्याने म्हटलंय, आज मुंबईच्या लोकलमध्ये या महिलेची भेट झाली. या महिलेला कॅन्सरने ग्रासलं आहे (Cancer Survivor Women). जगण्याच्या अस्तित्वासाठी ही महिला ट्रेनमध्ये गाते तसंच इतर कॅन्सर पीडितांचा मदतीसाठी ती आव्हान करते. या महिलेचा आवाज खूपच सुंदर आहे. (Women Singing Song in Mumbai Local)
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी म्हटलंय, आम्ही देखील या महिलेला लोकलमध्ये गाताना पाहिलं आहे. ही महिला माईक आणि स्पिकर घेऊन लोकलमध्ये चढते आणि आपल्या सुंदर आवाजात गाते. अगदी विनम्रपणे ती लोकांकडे मदतीची विनंदी करते, पण यात कुठेही जबरदस्ती नसते. या महिलेचा आवाज ऐकून आणि ज्या कारणासाठी ती गाणं गाते ते ऐकून लोकं भावून होतात आणि स्वत:हून त्या महिलेला मदत करतात.
कॅन्सरचे महागडे उपचार
कॅन्सर अर्थात कर्करोग (Cancer) हा जीवघेणा आजार मानला जातो. कॅन्सरमुळे जगरभरात दरवर्षी लाखो व्यक्तींचा मृत्यू होता. कॅन्सर जीवघेण्या स्वरुपाचा आजार असला तरी आता प्रगात वैद्यकीय उपचारांमुळए रुग्णांना दिलासा मिळत आहे. पण कॅन्सरवरचे उपचार महागडे असल्याने प्रत्येक रुग्णाला ते परवडतीलच असं नाही. त्यामुळेच या महिलेने वेगळा मार्ग निवडला आहे.
लोकलमध्ये पैसे मागणारे अनेक जण आपण नेहमीत पाहतो. पण प्रत्येकावरच लोकं विश्वास ठेवतात असं नाही. पण या महिलेचा हेतू अगदी स्पष्ट आहे. ही महिला दररोज माईक आणि स्पीकर घेऊन लोकलमध्ये एन्ट्री करते आणि सूंदर आवाजात गाणं गात लोकांचं मनोरंजन करते. आतापर्यंत अनेक मुंबईकरांनी मदतीचे हात पुढे केले आहेत.