Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी (Mumbai) लोकल ट्रेन (Local Train) ही लाइफलाइन (Lifeline) आहे. लोकलशिवाय मुंबईकर कसलाही विचार करु शकतं नाही. गर्दीने खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवाशी खाली पडल्याचा अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. त्यामुळे लोकलमधील गर्दीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जातं आहे. असं असताना नुकताच एक लोकल ट्रेन दुर्घटनेचा (Local accidents) धक्कादायक व्हिडीओ (Shocking video) समोर आला आहे.  गर्दीमुळे चालत्या ट्रेनमधून माय-लेकी बाहेर फेकले गेले. अंगावर काटा आणणाऱ्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतो आहे. (mumbai Local Train woman and child ​Slipping Under Train Tracks cctv Video nmp)


देवदूतामुळे वाचले प्राण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर (Railway platform) आलेल्या लोकल ट्रेनमध्ये माय-लेक चढले. खचाखच भरलेल्या लोकल ट्रेन जशी सुरु झाली तसा मुलगा खाली पडला. पण देव तारी त्याला कोण मारी...प्लॅटफॉर्मवर असलेल्या आरपीएफच्या जवानाने (Railway Protection Force)त्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. पण पुढे जे घडलं ते अजून धक्कादायक आहे. 


अंगावर काटा आणणारा Video



काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता, लेकखाली पडल्या त्याला वाचविण्याच्या नादात धावत्या ट्रेनमधून आईही खाली फेकल्या गेली. पण या महिलेचेही नशीब बैलवत्तर होतं म्हणून तिथे असलेल्या एका जवानाने तिचा जीव वाचविला. आरपीएफच्या जवानांमुळे या दोघांचे प्राण वाचले. मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) रेल्वे स्टेशनवरील हा थरार CCTV मध्ये कैद झाला आहे. ही घटना मंगळवारी 1 नोव्हेंबर 2022 ला दुपारी 12.30 च्या दरम्यान घडली. दरम्यान आरपीएफच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवून या दोघांचे प्राण वाचवल्यामुळे त्यांचं इतर प्रवासी कौतुक करत होते.