मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहेत. मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत झपाट्याने वाढत आहेत. ज्यामुळे सरकारने आता जमाव बंदीचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे लोकांना नवीन वर्षासाठी पार्टी देखील साजरा करता येणार नाही आहे. ही जमावबंदी 7 जानेवारी 2022 पर्यंत लागू राहणार आहे. मुंबईत झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे आणि राज्यात लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध लागू करण्यावर देखील आपलं वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्यामंत्री राजेश टोपे यांच्या अशा वक्तव्यानंतर मुंबईत केव्हापासून लॉकडाऊन लागू शकतो याकडे लोकांच्या नजरा वळल्या आहेत. गेली 2 वर्ष कोरोनामध्येच गेल्यामुळे हा नवीन वर्ष तरी काही नवीन घेऊन येईल. असे लोकांना वाटत होते. मात्र राजेश टोपे यांच्या लॉकडाऊनच्या संकेतामुळे लोकांचा हिरमोड झाला आहे.


बुधवारी पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले की, कोविड पॉझिटिव्हिटीचा दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त झाला तर राज्य सरकारला निर्बंध परत आणण्याचा विचार करावा लागेल. याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच कोविड टास्क फोर्सची बैठक घेणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.


टोपे म्हणाले की, राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब आहे. मुंबईचा सध्याचा सकारात्मकता दर 4% आहे. जर हा दर 5% च्या वर गेला तर सर्वत्र बंदी घालण्याचा विचार करावा लागेल.


पत्रकारांशी बोलताना टोपे यांनी लोकांनी आणि अधिकाऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, गेल्या आठ-दहा दिवसांत राज्यात पाच हजार ते सहा हजारांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आहे. टोपे म्हणाले की, मंगळवारी राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 11 हजार 492  होती. बुधवारी ही संख्या 20 हजारावर पर्यंत पोहोचू शकते. मंत्री म्हणाले, 'राज्यातील सक्रिय प्रकरणांमध्ये झालेली वाढ भयावह आहे.'


दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत कोरोनाच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्या प्रकारे ही संख्या वाढत आहे, ते पाहता आजपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 2000 च्या पुढे जाऊ शकते. यापूर्वी आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी शहरातील प्रचलित COVID19 परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी एका बैठकीला हजेरी लावली.