मुंबई :  मुंबईत लॉकडाऊन (Mumbai Lockdown) नको असेल तर काटेकोर नियम पाळा, (Mumbai Lockdown)  पालकमंत्री अस्लम शेख (Gaurdian Minister Aslam Shaikh) यांनी मुंबईकरांना इशारा दिला आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. पुन्हा एकदा राज्यात ६ हजार कोरोनाबाधितांचा आकडा झाला आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम कठोर करण्यात आले आहेत. असं असताना आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईकरांनो नियम पाळले नाही तर लॉकडाऊन लावावा लागेल अशा इशारा पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे. सातत्याने सरकारकडून कोरोना नियम पाळण्याचं आवाहन केलं जातं आहे. पण मुंबईत नियमांना हरताळ फासला जातोय. नागरिक गर्दी करतायत, लग्न समारंभांना ३००- ४०० लोक बोलावले जातायत हे गंभीर आहे असं म्हणून शेख यांनी नाराजी व्यक्त केली. 


कोविड सेंटर होणार सुरू 


मुंबईतली कोविड सेंटर्स पुन्हा सुरू होणार आहेत. मुंबई मनपा आयुक्तांनी आदेश दिले आहेत.  मुंबईत ७० हजारहून अधिक खाटा उपलब्ध करण्यात येणार आहे. मुंबईकरांनो नियम पाळले नाही तर लॉकडाऊन लावावा लागेल अशा इशारा पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे. सातत्याने सरकारकडून कोरोना नियम पाळण्याचं आवाहन केलं जातं आहे. पण मुंबईत नियमांना हरताळ फासला जातोय. नागरिक गर्दी करतायत, लग्न समारंभांना ३००- ४०० लोक बोलावले जातायत हे गंभीर आहे असं म्हणून शेख यांनी नाराजी व्यक्त केली. 


मुंबईतली सर्व कोविड सेंटर्स लवकरच सुरू होणार आहेत. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने कोविड सेंटर्स पुन्हा सुरू होणार आहेत. पालिका आयुकांनी एका आठवड्याच्या कालावधीत ही सेंटर्स सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. नोव्हेंबर महिन्यानंतर रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे बहुतांश कोविड काळजी केंद्रे बंद करण्यात आली होती.