गणेश कवडे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिकेने खासगी कंपन्यांच्या सहकार्याने सर्वसामान्यांना एक अनोखी सुविधा द्यायचा उपक्रम हाती घेतलाय. अंधेरी पूर्वेला आंबेवाडी भागात यासाठी दोन मजली केंद्र सुरु केलंय. या केंद्रात अवघ्या ५५ रुपयांमध्ये १ बादली कपडे धुता येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अत्यंत चांगल्या दर्जाच्या केंद्रात सर्वसामान्यांना, गरिबांना वॉशिंग मशीनमध्ये आपले कपडे धुऊन सुकवून नेता येणार आहे. यासाठी केवळ ५५ रुपये मोजत एक बादली म्हणजेच साधारण १२ कपडे धुण्याची सोय करण्यात आली आहे. त्याच बरोबर १ रुपयात १ लिटर पिण्याचे पाणी, शौचालय आणि आंघोळीचीही सुविधा या केंद्रात देण्यात आल्या आहेत.


दोन खासगी कंपन्याच्या सहकार्याने सुरु केलेल्या या उपक्रमाला पालिकेने सुविधा असं नाव दिलंय. त्यामुळे नागरिकांनीही या मिळत असलेल्या सुविधेचं स्वागत केलंय. अल्प उत्पन्न गटातील लोकांच्या स्वच्छतेच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आलंय.