Mandwa To Gateway Ferry Service Suspend : मुंबईहून मांडवा किंवा अलिबागला फिरायला जाण्यासाठी प्लॅन करत असाल, तर मग तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण पुढील तीन महिने मुंबई ते मांडवा ही जलवाहतूक तीन महिने बंद असणार आहे. मुंबईतील गेटवे ते मांडवा ही सागरी वाहतूक तब्बल 3 महिन्यांसाठी बंद ठेवली जाणार आहे. यामुळे तुम्हाला समुद्रामार्गे प्रवास करता येणार आहे. यासाठी तुम्हाला पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेरीटाइम बोर्डाने नुकतंच याबद्दलचे परिपत्रक जारी केले आहे. यात त्यांनी मुंबई ते मांडवा जलवाहतूक 26 मे पासून तीन महिन्यांसाठी बंद राहणार असल्याची माहिती प्रवाशांना कळवली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 


26 मे पासून तीन महिने बंद


पावसाळ्यात बहुतांश वेळा समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे जलवाहतूक करणाऱ्या प्रवाशी बोटींना तसचे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर मुंबई ते मांडवा जलवाहतूक 26 मे पासून तीन महिन्यांसाठी बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे आता पुढील काही महिने मुंबई ते मांडवा ही वाहतूक रस्ते मार्गानेच करावी लागणार आहे. 


पर्यटनावर परिणाम


दरम्यान मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा या दरम्यान जलवाहतुकीला अनेकजण पसंती दर्शवतात. मुंबईहून स्वस्त दरात आणि कमी वेळेत रायगड किंवा अलिबाग गाठणं या जलवाहतुकीमुळे शक्य होते. त्यामुळे असंख्य पर्यटकही या जलवाहतुकीचा आनंद घेतात. पीएनपी, मालदार, अजंठा, अपोले या कंपन्यांच्या बोटी मांडवा ते गेट वे या मार्गावर जलवाहतूक प्रवासी सेवा देतात. पण आता पावसाळ्याचे काही महिने ही सेवा बंद केली जाणार आहे. याचा परिणाम अलिबाग आणि रायगडमधील पर्यटनावरही होणार आहे.