Exclusive - गुडन्यूज! मुंबईत वाहतुकीला नवा पर्याय!
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांना वाहतूकीसाठी एक जबरदस्त पर्याय निर्माण होणार आहे. ज्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सोपा आणि कमी वेळात होणार आहे.
मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांना वाहतूकीसाठी एक जबरदस्त पर्याय निर्माण होणार आहे. ज्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सोपा आणि कमी वेळात होणार आहे.
कसा असेल मार्ग?
मेट्रो, मोनो पाठोपाठ आता मुंबईत रोप वे वाहतूक सुरु होणार आहे. सुरूवातीला शिवडी-न्हावा शेवा अशी वाहतूक सुरु करण्यात येणार असून त्यानंतर या रोप वेचा उरणपर्यंत विस्तार करण्यात येईल. कसा असेल हा रोप वे याची एक्स्क्लुझिव्ह माहिती झी २४ तासकडे उपलब्ध झाली आहे.
वाहतुकीची नवा पर्याय
मुंबईत वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी रोप वेचा नवा पर्याय सुचवण्यात आला असून भविष्यात वांद्रे-बीकेसी-कुर्ला, वाशी-बेलापूर अशा अनेक मार्गांवर रोप वे सुरु करण्याचा विचार आहे. मुलुंड ते बोरीवली हे अंतरही रोप वेमुळे केवळ दहा मिनिटांत पार करता येणार आहे. वाहतुकीच्या या नव्या पर्यायाबद्दल इंडियन पोर्ट रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनुप अग्रवाल यांनी माहिती दिली.