मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 12 तासांचा जम्बोब्लॉक
लोकलनं प्रवास करण्याआधी ही बातमी पाहाच, नाहीतर होऊ शकतं तुमचं मोठं नुकसान
मुंबई : तुम्ही जर लोकलनं प्रवास करण्याच्या विचारात असाल तर वेळापत्रक न पाहता बाहेर पडूच नका. कारण मध्य रेल्वेवर उद्या जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ शकतात.
मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप, डाऊन जलद मार्गावर सकाळी 9 ते रात्री 9 असा 12 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे उद्या प्रवास करण्याआधी वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा.
सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद लोकल सकाळी 7.55 ते रात्री 7.50 पर्यंत मुलुंड ते ठाणे, कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर चालवणार आहे. तर कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद लोकल सकाळी 8.36 ते रात्री 7.50 पर्यंत कल्याण ते मुलुंड दरम्यान अप धीम्या मार्गावर धावतील.
ठाणे ते वाशी, अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर आज रात्री 11.45 वाजल्यापासून पहाटे पावणेसहा पर्यंत मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वेवरही आज रात्री 11.45 पासून उद्या सकाळी पावणे पाचपर्यंत बोरिवली ते अंधेरी दोन्ही जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल.