Mumbai Local Mega Block : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळ, सिग्नलच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम  रेल्वेवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते 3.15 या वेळेत अभियांत्रिकी काम चालणार आहे. त्यामुळे सीएसटीहून सुटणाऱ्या सर्व डाऊन जलद लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर रविवार, 14 मे 2023 रोजी पश्चिम रेल्वे उपनगरी विभागात दिवसाच्या वेळेत कोणताही ब्लॉक नाही. फक्त रात्रीचा ब्लॉक असणार आहे.


मध्य रेल्वेवर ब्लॉक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यापुढील सर्व जलद लोकल मुलुंडपासून जलद मार्गावर चालविण्यात येतील. हार्बरवर सीएसटी ते चुनाभट्टी-वांद्रे मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4.11 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे..  तर पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते नायगाव स्थानकांत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर ब्लॉक आहे. त्यामुळे विरार, वसई ते बोरीवलीपर्यंत दोन्ही मार्गांवर लोकल धीम्या मार्गावर चालतील. मेगा ब्लॉग कालावधीत सर्व अप जलद लोकल ठाण्यापासून मुलुंड, भांडूप, विक्रोळी घाटकोपर, कुर्ला स्थानकावर थांबतील. यामुळे सीएसटीकडे ये-जा करणाऱ्या सर्व लोकल किमान 10 मिनिटे उशीराने धावतील. 


तसेच सीएसटी ते वाशी, बेलापूर, पनवेल सेवा सकाळी 11.34 ते सायं.4.47 पर्यंत आणि वांद्रे, अंधेरी, गोरेगावपर्यंतची सेवा सकाळी 9.56 ते दुपारी 4.43 पर्यंत खंडित केली जाणार आहे. तर पनवेल, बेलापूर, वाशी ते सीएसएमटीपर्यंतची सेवा सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 आणि वांद्रे, अंधेरी, गोरेगावहून सकाळी 10.45 ते दुपारी 4.58 पर्यंत सेवा खंडित करण्यात येणार आहे. या कालावधीत पनवेल आणि कुर्लामधून काही विशेष लोकल चालवण्यात येतील.


हार्बर लाइन


पनवेल - वाशी अप आणि डाऊन हार्बर लाइन्सवर (सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05  ) असणार आहे. सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेलहून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत सीएसएमटी मुंबईहून सुटणाऱ्या पनवेल/बेलापूरकडे जाणार्‍या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलहून सुटणारी ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याकडे जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


ट्रान्स - हार्बर लाइन


ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी,नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत विशेष उपनगरीय गाड्या सीएसएमटी मुंबई-वाशी सेक्शनवर धावतील.


उरण लाइन


बेलापूर - नेरुळ - खारकोपर सेवा सुरु राहणार आहे. ब्लॉक कालावधीत बेलापूर- नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.