Railway Megablock :  मध्य रेल्वेने (Central Railway) रविवारी विविध कामांसाठी मेगाब्लॉक (Mega Block) घोषित केला आहे. मेगाब्लॉकमुळे काही मार्गावरील लोकल (Local) उशिराने धावणार आहेत. परिणामी आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी कुठे फिरण्यासाठी बाहेर जाण्याचा प्लान करत असाल, तर सर्वात आधी मुंबई लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या...


मध्य रेल्वे (central railway)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठे -  विद्याविहार - ठाणे मार्गापर्यंत 
कधी-  सकाळी 11.00 ते दुपारी 3.30 पर्यंत 
दरम्यान ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या डाऊन आणि अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहार दरम्यान, डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि वेळेपेक्षा 10 ते 15  मिनिटं उशिराने धावतील. 


हार्बर रेल्वे (harbour railway)


कुठे - CSMT ते चुनाभट्टी/वांद्रे 
कधी -  सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत 
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तसेच  ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. 


हार्बरवरील प्रवाशांना मेगाब्लॉकमुळे खास सूट 


हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरुन प्रवास करण्याची परवानगी असेल. या पायाभूत सुविधा अपग्रेड ब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.