Mumbai Metro 3 First Phase News In Marathi: कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो (Mumabi Metro 3) मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. भुयारी मार्गातील  सीप्झ ते वांद्रे या पहिल्या टप्प्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन सज्ज आहे. या कामाचा एक भाग म्हणून कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडून भुयारी मेट्रोच्या कामाची सातत्याने पाहणी करत कामाचा आढावा घेतला जात आहे. दरम्यान भुयारी मार्गावरील पहिल्या टप्प्याच्या चाचण्या मे अखेरपर्यंत पूर्ण केल्या जाणार आहे. त्या हेतूनेच मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (MMRC) तयारी पूर्ण केली आहे. या चाचण्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इंडीपेंडंट सेफ्टी असेसर (ISA) आणि कमिशनअर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (CMRS) यांना तपासणीसाठी बोलविले जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमएमआरसीकडूव 33.5 किमी लांबीचा कुलाबा - वांद्रे - सीप्झ मेट्रो 3 मार्गिकेची काम पूर्ण होऊन ही मार्गिका सेवेत  दाखल होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांनी या प्रकल्पास विलंब झाला असून आता तीन टप्प्यात मार्गिक सुरु करण्याचा एमएमआरसीनेचा प्रयत्न आहे.  तसेच मागी महिन्याच्या सुरुवातीला मेट्रो गाडीच्या 95 किमी प्रतितास या  वेगावर चाचण्या घेतल्या जात होत्या. याचबरोबर टेलिकम्युनिकेशन यंत्रणा, प्लॅटफॉर्म स्क्रीम डोअर, ट्रॅक्शन आणि रुळ आदींच्या चाचण्यांचा समावेश आहे. तर पुढील आठवड्यापासून मेट्रो गाडीच्या स्टॅटीक लोडसह चाचण्या मे महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन एमएमआरसीने केले आहे. 


कधी सुरु होणार मेट्रो 3 मार्गिका?


मेट्रो गाडीच्या स्टॅटीक लोडसह चाचण्या पुर्ण होताच मेट्रो मार्गिका संचलनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया एमएमआरसीकडून सुरु केली जाणार आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार महिन्यांत मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यांची चिन्हे आहेत. 


'या' वेळेत धावणार मेट्रो


आरे-बीकेसी मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर येथे सुमारे 9 मेट्रो ट्रेन धावणार आहेत. यापैकी फक्त दोनच मेट्रो ट्रेन देखभाल आणि स्टँडबायसाठी ठेवण्यात येणार आहेत. या मेट्रो ट्रेन सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत धावेल. एक्वा लाइन कॉरिडॉर 33.5 किमी पर्यंत विस्तारित आहे. या मार्गावर एकूण 10 स्थानके असून दररोज सुमारे 260 राउंड-ट्रिप सेवा उपलब्ध असतील. 


मेट्रो 3 मार्गिकेची वैशिष्ट्ये


पहिला टप्पा : आरे  ते बीकेसी 
पहिल्या टप्प्यातील एकूण स्थानके: 10 
एकूण खर्च : 37,000 कोटी रुपये 
एकूण स्थानके : 27