Buffalo Milk Price Hike: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महागाईत सातत्याने वाढ होत असतानाच आता दुधाच्या किंमतीतही वाढ झाल्या आहेत. मुंबई दूध उत्पादक संघाने (एमएमपीए) शहरातील म्हशीच्या दुधाच्या घाऊक किंमतीत 2 टक्के वाढ केली आहे. 1 सप्टेंबरपासूनच हा बदल लागू होणार आहे. 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. अशातच सणासुदीच्या दिवसात दुधाच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईस सध्या 1 लीटरच्या दुधाची किंमत 87 रुपये प्रति लीटर इतकी आहे. मात्र नवीन दर लागू झाल्यानंतर म्हशीच्या दुधाची किंमत 89 रुपये प्रति लीटर होणार आहे. MMPAने हा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. त्यामुळं शहरातील तीन हजार पेक्षा जास्त किरकोळ विक्रेत्यांवर याचा परिणाम होणार आहे. त्याचाच परिणाम म्हणजे किरकोळ किंमतींमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. साधारण सहा महिन्यांपर्यंत ही दरवाढ कायम राहू शकते. दुधाच्या घाऊक किंमतीत वाढ झाल्यानंतर किरकोळ किंमती 93 ते 98 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढ होऊ शकते. ही दरवाढ त्या परिसरातील मागणीनुसार ठरते. 


किरकोळ किंमतींमध्ये घाऊक दरापेक्षा 4 ते 10 रुपयांची वाढ दिसून येत आहे. वर्षभरातील ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी म्हशीच्या दुधाची किंमत 85 रुपये वरुन 87 रुपये प्रति लीटर झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा  87 रुपयांवरुन 89 रुपयांपर्यंत झाले आहेत. त्यामुळं ग्राहकांना जोरदार झटका बसला आहे. 


सध्या शहरात गणेशोत्सवाची धूम आहे. सणासुदीच्या काळात दुधाची सर्वात जास्त मागणी असते. गोडाचे पदार्थ बनवण्यासाठी दुध हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. बाप्पाच्या नैवेद्यासाठी व मिठाईसाठी दूधाचा वापर केला जातो. अशातच दूधाच्या दरवाढीमुळं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, अनेक दूध व दूधाच्या उत्पादनांच्या किंमतीदेखील वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


जानेवारी 2024मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळाने खासगी प्रकल्प आणि सहकारी संस्थांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर INR 5 अनुदान देण्याची घोषणा केली होती. दुग्ध व्यवसायिकांना आधार देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.