मुंबई : मनसेतून बाहेर पडलेल्या मुंबईतील नगसेवकांना धडा शिकवण्यासाठी मनसे सज्ज झाली आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मला रक्कम ऑफर झाली होती, असा दावा मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तशी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे. 


कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक १६६ चे नगरसेवक संजय तुर्डे यांनी एसीबीला पत्र लिहून ही माहिती दिली आहे. मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांनी मनसेची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. केवळ संजय तुर्डे हे फुटले नाहीते. मुंबई महापालिकेत मनसेची साथ न सोडलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी प्रामाणिक असल्याची प्रतिक्रिया दिली होती.


शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी मला शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. भविष्यासाठी हा चांगला पर्याय असल्याचं लांडेंनी सांगितलं, असं संजय तुर्डे म्हणाले होते. गेल्या आठवड्यात मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.