केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बंगला वादात, मुंबई पालिकेची नोटीस
BMC Notice to Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई महापालिकेकडून नोटीस धाडण्यात आली आहे.
मुंबई : BMC Notice to Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेकडून नारायण राणे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. राणेंचा बंगला वादात सापडला आहे. जुहूतील बंगल्याची तपासणी आणि मोजमाप करण्याकरता ही नोटीस पाठवण्यात आली आहे. (Mumbai Municipal Corporation issues notice to Union Minister Narayan Rane)
2017मध्ये नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याबाबतची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली होती. तक्रारीत बंगल्याचे बांधकाम सीआरझेडचे उल्लंघन करुन केल्याचे म्हटले होते. ( Coastal Regulations Zone (CRZ) norms) त्यानुसार आता तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या के वेस्ट वॉर्डकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारीत तथ्य आढलेल तर काय कारवाई होणार, याची उत्सुकता आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी पाहणी आणि मोजमाप करण्यासाठी जुहू येथील राणे यांच्या बंगल्याबाबत नोटीस बजावली आहे. के-पश्चिम वॉर्डच्या (अंधेरी पश्चिम) अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेली एक नोटीस गुरुवारी मुंबई महानगरपालिका (एमएमसी) अधिनियम, 1888 च्या कलम 488 अन्वये पाठविण्यात आली आहे.
माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी बंगल्याच्या बेकायदेशीर बांधकामाबाबतच्या त्यांच्या मागील तक्रारींवर मुंबई महापालिकेने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच याबाबत स्मरणपत्र तक्रार दाखल केल्यानंतर बीएमसीने ही कारवाई करत ही नोटीस पाठवली आहे.