मुंबई : महापालिकेत शिवसेनेचं संख्याबळ एकनं वाढणार आहे. काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक ३२ च्या नगरसेविका स्टेफी किणी यांचं नगरसेवक पद रद्द झालंय. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गीता भंडारी यांना नगरसेवकपद बहाल केलं जाईल. ज्यामुळे पालिकेत शिवसेनेचं संख्याबळ ९५ होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेफी किणी यांनी सादर केलेलं जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं फेटाळलं. जातपडताळणी समितीच्या निर्णयाला या नगरसेविकेनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी या निर्णयाला दिलेली स्थगिती उठवली. 


स्टेफी किणी यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याचा निकाल दिला. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेच्या उमेदवार गीता किरण भंडारी यांना नव्या वर्षात पालिकेत नगरसेवकपदाची संधी मिळेल. यामुळे पालिकेतील शिवसेनेचं संख्याबळ आता ९५ होईल.