मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (BMC Standing Committee Chairman Yashwant Jadhav ) यांनी खळबळजनक दावा केला आहे. भाजपचे (BJP) काही नगरसेवक त्यांच्या नेतृत्वाला कंटाळलेले आहेत, अशी मंडळी सेनेच्या संपर्कात आहेत, भाजपात नेतृत्व नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच कमीत कमी 15 ते 20 भाजप नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे. डिसेंबरमध्ये याबाबत अधिक स्पष्टता दिसेल असंही यशवंत जाधव यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Election) सर्वच पक्ष रणनिती आखतायत. या पार्श्वभूमीवर यशवंत जाधव यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पालिकेत विरोधी पक्ष काँग्रेस आहे त्यामुळे भाजपाने विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहू नये असंही यशवंत जाधव यांनी बजावलं आहे.


आश्रय योजनेत घोटाळा?


बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या वसाहतीसंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेमार्फत ‘आश्रय योजना’ (Ashray Yojana) सुरु करण्यात आली होती. या योजनेत 1800 कोटींचे घोटाळ्याचे आरोप करण्यात आला होता. हे आरोप चुकीचे असल्याचं यशवंत जाधव यांनी म्हटलं आहे. मी सफाई कामगाराचा मुलगा आहे आणि त्याचा मला अभिमान आहे, सफाई कामगारांची परवड मी पाहिली आहे, शिवसेना पक्ष एकाही सफाई कामगारावर अन्याय होऊ देणार नाही असं यशवंत जाधव यांनी म्हटलं आहे.


दर शिवसेनेने ठरवलेले नाहीत, निविदे प्रमाणे पात्र त्याप्रमाणे दर मंजूर करण्यात आले. SRA प्रति चौरस फूट दराबाबत आरोप करणारे, निविदा मागवली जात असताना आरोप करणारे गप्प का असा सवाल यशवंत जाधव यांनी उपस्थित केला आहे.  हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आणला तेव्हा ही बाब निदर्शनास का आणली नाही, आश्रय योजना, बाबासाहेब आंबेडकर श्रमसफल्य योजना आधी समजावून घ्यावेत, दोन वेगळ्या योजना आहेत,  2018 पासून प्रस्ताव पास होत असताना आरोप करणारे गप्प का होते ? असा सवालही यशवंत जाधव यांनी विचारला आहे.


सफाई कामगारांना घरं मिळवून देण्यासाठी मी, सेना सातत्याने प्रयत्न करत आहेत,  ही योजना बदनाम करण्याचा भाजपाचा कुटील डाव आहे, असा आरोपही यशवंत जाधव यांनी केला आहे. 


गेल्या 24 तासात एकही मृत्यू नाही


मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, याबाबत बोलताना यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासकीय टीमचं अभिनंदन केलं. मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे, राजेश टोपे, मंत्रीगण सर्वांचंही त्यांनी अभिनंदन केलं. जगासमोर उत्तम उदाहरण मुंबईने ठेवलं, कोणतंही संकट असो शिवसेनेने मुंबईकरांना निराश केलं नाही, असं यशवंत जाधव यांनी म्हटलं आहे.