फी वाढीचा `या` शाळांना दणका, शाळांची मान्यता होणार रद्द?
कोणत्या शाळांची मान्यता रद्द केली
मुंबई : कोरोनाच्या संकटकाळातही मुंबई, नवी मुंबईत अनेक खासगी शाळांची मनमानी समोर आली आहे. नवी मुंबई विभागातील एकूण पाच शाळा, मुंबईतील दोन आणि पनवेलमधील एका शाळेचं नाव समोर आलं आहे. अनेक शाळांनी या संकट काळात फी वाढ केल्याचही समोर आलं होतं. (Mumbai, Navi Mumbai: Proposal to cancel NOCs issued to 8 schools)
फी वाढ करणे, फी भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावणे, फी न भरल्याने विद्यार्थ्यांना निकालपत्र न देणे असं करुन विद्यार्थी आणि पालकांना त्रास देणाऱ्या शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शाळांचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याच्या संदर्भातील प्रस्ताव शिक्षण संचालक ,पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
कोणत्या शाळांची मान्यता रद्द केली आहे आणि का केली आहे
मुंबई, नवी मुंबईतील 8 शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव.....
फी न भरल्याने ऑनलाईन शिक्षण न दिल्याने शाळांची मान्यता रद्द?
मुंबईतील 2, नवी मुंबईतील 6 शाळांची मान्यता रद्द?
कोरोनाकाळात फी वाढ,निकालपत्र राखून ठेवण्याचा ठपका...
मुंबईतील दोन शाळांची मान्यता रद्द होणार...
सांताक्रूझमधील बिल्लाबाग इंटरनॅशनल स्कूल....
मालाडमधील बिल्लाबाग इंटरनॅशनल स्कूल....
नेरूळमधील अमृता विद्यालय...
ऐरोलीमधील न्यू होरायझन पब्लिक स्कूल...
सानपाडामधील रायन इंटनॅशनल स्कूल
वाशी येथील सेंट लॉरेन्स स्कूल...
कोपखैरणेमधील तेरणा ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल....
खारघरमधील विश्वज्योत हायस्कूल
शाळांवर ठेपलेला ठपका
लॉकडाऊन कालावधीत फी वाढ करणे
पालकांकडे फी भरण्यास तगादा लावणे
फी न भरल्यामुळे निकालपत्र रोखून ठेवणे
विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात बढती न देणे
फी न भरल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून कमी करणे