मुंबई : फिटनेसचे धडे देणारा जिम ट्रेनरचं ( gym trainer) ड्रग्ज पेडलर (drug peddler) निघाल्याने खळबळ उडाली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) कारवाई करत घाटकोपर परिसरातील एका जिम ट्रेनरला अटक केली आहे. शुभम भगत असे अटक करण्यात आलेल्या जिम ट्रेनरचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी गांजा, चरस आणि एलएसजीसह इतर अमली पदार्थ जप्त करण्यात आले. एनसीबीने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने शुभमला दोन दिवसांची एनसीबी कोठडी सुनावली.


एनसीबीचे अधिकारी शुभमकडे चौकशी करत आहे. चौकशीनंतर मिळालेल्या माहितीनंतर अधिकारी अधिक तपास करणार आहे.  या ड्रग्ज रॅकेटमागे आणखी लोकांचा हात असल्याचा संशय आहे. याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तळोजा पोलिसांनी एमडी ड्रग्ससह एका नायझेरियन नागरिकाला अटक केली होती. त्याच्याकडे 57.50 ग्रॅम वजनाचा 8 लाख 62 हजार रुपये किंमतीचे मेफेड्रीन आढळून आले.