मुंबई : आजपासून (गुरुवार) दुचाकीनं प्रवास करणाऱ्यांना मोठ्या बदलाला सामोरं जावं लागणार आहे. किंबहुना या बदललाला सामोरं जाण्यासाठी अनेकांचीच नाराजी असली तरीही आता पर्याय नाही हेसुद्धा तितकंच खरं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुचाकीस्वार आणि त्यातही मुंबईतील दुचाकीस्वार ज्या बदलाला सामोरे जाणार आहेत तो म्हणजे, सहप्रवाशांना असणारी हेल्मेट सक्ती. (mumbai new rule today onwards helmet compulsory for pillion rider)


आजपासून या नियमाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडून सदरील नियमाची अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर पाळत ठेवण्यासाठी जवळपास 50 वाहतूक पोलीस चौक्या सक्रीय असतील. 


काय आहे नवा नियम? 
आजपासून इथुन पुढं दुचाकीनं प्रवास करणाऱ्यांमध्ये चालकासोबतच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्तीचं असणार आहे. 


हेल्मेट नसल्यास कोणती कारवाई ? 
दुचाकीवर असणाऱ्या सहप्रवाशाच्या डोक्यावर हेल्मेट नसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय तीन महिन्यांसाठी चालक परवानाही निलंबित केला जाणार आहे. शिवाय 500 रुपये दंडाची रक्कमही आकारली जाणार आहे. 


मुंबईकरांचा नव्या नियमाला विरोध 
मुंबईकरांनी सहप्रवाशाच्या हेल्मेट सक्तीला विरोध केला असला तरीही हा निर्णय मागे घेण्यात आलेला नाही. 40 किलोमीटर वेगानं प्रवास करताना कशाला हवं हेल्मेट, गल्लीबोळातून दुचाकी नेताना मागे असणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट कशासाठी इथपासून, सर्व नियम मुंबईकरांवरच का लादण्यात येतात असे बोचरे प्रश्न मुंबईकरांनी विचारले.