मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धारावीतील 450 हून अधिक काँग्रेस (Congress) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी (BJP) मध्ये प्रवेश केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्थानिक आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचे कट्टर समर्थक असल्याने त्यांच्या भाजपा प्रवेशाने आमदार गायकवाड यांना मोठा धक्का बसला आहे.  विशेष म्हणजे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते कुंची कोरवे समजाचे आहेत. धारावीमध्ये या समाजाचे प्राबल्य असून यांची भूमिका निर्णायक मानली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसची धारावीविरोधी भूमिका
गेल्या काही महिन्यांपासून धारावी पुनर्विकास प्रक्रियेला वेग आला असून अद्यापही काँग्रेससह इतर विरोधक केवळ राजकारणासाठी या पुनर्विकास प्रक्रियेमध्ये खोडा घालत असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या राजकारणाला कंटाळून धारावीच्या विकासासाठी आणि धारवीकरांच्या भल्यासाठी भाजपा मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने तसंच मुख्यमंत्री  एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात धारावीच्या हितासाठी कार्य करत राहणार असल्याचं साबु केदारे यांनी सांगितलं.


धारावी पुनर्विकास प्रकल्प यशस्वी करण्यासाठी डिआरपीपीएल कटिबध्द
गेल्या अनेक दशकांपासून रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला महायुती सरकारच्या काळात ऊर्जितावस्था प्राप्त झाली असून राज्य सरकारच्या वतीने धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (डिआरपीपीएल) या विशेष कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. धारावीचा पुनर्विकास करतानाच इथल्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपाययोजना डीआरपिपीएलच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.


धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
धारावीच्या पुनर्विकासाचा मार्ग  गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडला होता, तो आता मोकळा झाला आहे. अदानी कंपनीमार्फत धारावीचीॉा पुनर्विकास होणार असून झोपडीधारकांना 300 ते 400 चौरस फुटांचं घर मिळणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प शहर नूतनीकरण, पायाभूत सुविधांचे पुनरुज्जीवनापर्यंत मर्यादित नसून त्याची व्याप्ती अधिक असल्याचे डीआरपीपीएलने नमूद केले आहे. जागतिक दर्जाच्या भागीदारांचा समावेश, धारावीवासीयांच्या सहभागातून धारावीचा नागरी पुनर्विकास जागतिक स्तराचा होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.