Mumbai News : मुंबईतील जुनी घरंही सोन्याची पेटी; विकण्याआधी वाचा Real Estate क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी
Mumbai News : मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच... शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रावर लक्ष ठेवून असणांसाठी मोठी बातमी. नवं घर घेणाऱ्यांनो.... पाहिलं का?
Mumbai News : स्वप्ननगरी, माया नगरी... अशा अनेक विशेषणांनी मुंबईचा उल्लेख केला जातो. या मुंबई शहरात आजही दर दिवशी मोठ्या संख्येनं अनेक मंडळी येतात आणि इथं संघर्ष करून स्वत:चं हक्काचं घर आणि स्वत:ची ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. हे शहर इतकं कमाल आहे, की एका क्षणाची त्याची भुरळ अनेकांना पडते आणि खऱ्या अर्थानं ही मुंबई एखाद्याला पछाडून सोडते.
अशा या मुंबईचा चेहरामोहरा गेल्या काही काळापासून सातत्यानं बदलत असून, सर्वाधिक वेगानं बदलणारं क्षेत्र ठरत आहे ते म्हणजे Real Estate चं. गिरण्या, चाळी आणि कोळीवाडे अशी मुंबईची ओळख सध्या नव्या रुपानं सर्वांसमोर येत असून, गिरण्यांच्या ठिकाणी मोठाले शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि गगनचुंबी इमारती उभ्या असल्याचं पाहायला मिळत आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार मुंबईत मागील काही काळापासून घरांच्या मागणीत वाढ झाली असून, यामध्ये आलिशान घरांकडे अनेकांचाच कल दिसून येत आहे. 10 कोटी आणि त्याहून अधिक किमतीच्या घरांच्या विक्रीमध्ये 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्यामुळं घरांचे व्यवहार 12300 कोंटींच्याही पुढे गेल्याची बाब समोर आली. मागील वर्षी हा आकडा 11400 कोटी रुपयांवर स्थिरावला होता. (Real Estate Mumbai)
जुन्या घरांच्या विक्रीचे विक्रमी व्यवहार
2024 मधील पहिल्या सहा महिन्यांच्या कालावधीत शहरातील बहुतांश जुन्या घरांची विक्रमी विक्री झाली असून, यामध्ये सरासरी 3500 कोटी रुपयांचा व्यवहार झाला. 2023 मधील याच कालावधीदरम्यानच्या या आकडेवारीमध्ये 38 टक्क्यांनी वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे. थोडक्यात मुंबई शहरामध्ये जुन्या घरांनाही विक्रमी दर मिळताना दिसत आहेत.
हेसुद्धा वाचा : ₹ 370000000 चं घर... पुण्यातील आतापर्यंतची सर्वात महागडी प्रॉपर्टी डील! जाणून घ्या खासियत
शहरामध्ये अनिल गुप्ता आणि पॉलिएस्टर लिमिटेडकडून मलबार हिल येथील लोढा मलबारमध्ये केलेला 270 कोटींचा व्यवहार लक्ष वेधून गेला. यातच रेखा झुनझुनवाला यांच्या कुटुंबानं मलबार हिल येथील रॉकसाईड अपार्टमेंटमध्ये 156.5 कोटी रुपयांचं घर खरेदी करत अनेकांना थक्क केलं.
सीआरआय मॅट्रिक्सच्या अहवालानुसार शहरामध्ये जानेवारी ते जून 2024 दरम्यान 10 कोटी आणि त्याहून अधिक मागणीच्या घरांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. अहवालानुसार रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये दिसणारी ही उसळी स्थानिक अर्थवस्थेला सुगीचे दिवस आल्याचे स्पष्ट संकेत देत आहेत.