Mumbai News : वीकेंड अर्थात आठवड्याची अखेर म्हटली की, अनेकदा सुट्टीच्या निमित्तानं मित्रमंडळींसोबत काही ठिकाणांवर जाण्याचे बेत आखले जाता. यामध्ये मुंबईच्या दिशेनं येणाऱ्यांची संख्या मोठी असते, तर मुंबईतून नवी मुंबई आणि कर्जत- कसारा दिशेनं जाणाऱ्यांचा आकडाही पाहण्याजोगा असतो. थोडक्यात सुट्टी सर्वांनाच सत्कारणी लावायची असते. तुम्हीही या आठवडा अखेरीस असा काही बेत आखलाय का? बरं, तुमच्या प्रवासाचं माध्यम मुंबई लोकल ट्रेन आहे का? मग या माहितीकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका. 


मध्य रेल्वेवर पॉवर ब्लॉक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअर प्रकल्पाच्या कामांमुळं शनिवारी मध्यरात्र उलटल्यानंतर 1 वाजल्यापासून पहाटे 4.30 पर्यंत CSMT / छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ कसारा मार्गावर पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ज्यामुळं सीएसटीहून शनिवारी रात्री 11.50 वाजताच अखेरची लोकल सुटणार आहे. ब्लॉक सुरु होण्याआधी सीएसएमटी ते अंबरनाथ मार्गावर 11.51 ला शेवटची लोकल सुटेल. तर, सीएसएमटी ते कसारा शेवटची लोकल रात्री 10.50 मिनिटांनी सुटेल. 


शनिवारी कोणत्या लोकल फेऱ्या रद्द? 


मध्यरात्रीनंतर 12.24- कर्जत/ सीएसएमटी 
मध्यरात्री 12.04, रविवारी पहाटे 5.16, 6.19 - सीएसएमटी/ अंबरनाथ 
रात्री 9.35 - अंबरनाथ / सीएसएमटी 


टप्प्याटप्प्यानं घेतले जाणार 4 ब्लॉक 


शनिवारी रात्री 1.05 ते रविवार पहाटे 5.05 पर्यंत (कोपर ते ठाकुर्ली)
शनिवारी मध्यरात्री 1.30 ते रविवार पहाटे 4.30 पर्यंत (दिवा उड्डाणपूल...)


हेसुद्धा वाचा :  Weather Forecast Today : चक्रिवादळाच्या इशाऱ्यानंतर कसं असेल आजचं हवामान? 8 मे रोजी मोठ्या बदलाची अपेक्षा 


शनिवारी मध्यरात्री 1 नंतर रविवार पहाटे 4.45 पर्यंत (टिटवाळा मार्ग )
शनिवार मध्यरात्री 2 ते रविवार पहाटे 5 पर्यंत (खडवली ते आसनगाव)


मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही... 


दरम्यान, सिग्नल यंत्रणांची तांत्रिक कामं आणि रुळांच्या दुरुस्तीसाठी रविवारी ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असेल. तर, मध्य आणि हार्बर मार्गावर मात्र कोणाताही ब्लॉक नसल्यामुळं नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे-वाशी/ नेरुळ अप- डाऊन मार्गांवर मेगाब्लॉक असेल. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली- गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर मोगाब्लॉक असेल. त्यामुळं तुम्ही जर कुठेही जाण्याचा विचार करत असाल आणि त्यातही रेल्वे प्रवासाच्या बेतात असाल तर आताच पर्यायी मार्ग किंवा पर्यायी रेल्वेंचं वेळापत्रक पाहा, गर्दीचाही अंदाज घ्या.