अल्पवयीन मुलीला हॉटेल रुममध्ये नेलं आणि... गुजरातमधील व्यक्तीचा मुंबईत संशयास्पद मृत्यू, `त्या` औषधांनी वाढवला गुंता
Mumbai News : मुलगी सांगत हॉटेलवर नेलं... मुंबईत अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; शेवटी केलेल्या कृत्त्यानं पोलिसही चक्रावले
Mumbai Crime News : एका विचित्र घटनेनं मुंबई हादरली असून, या घटनेची माहिती समोर येताच खळबळ माजली आहे. गुजरातच्या सूरत येथील एका व्यक्तीचा संशयास्पद स्थितीमध्ये मृत्यू होऊन या व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मुंबईतील एका हॉटेलमध्ये या व्यक्तीचा मृतदेह आढळला असून, त्याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्ह्याचीही नोंद करण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार शनिवारी सायंकाळी 6.15 मिनिटांनी हॉटेलच्या मॅनेजरनं पोलिसांना फोन करत हॉटेलमधील एका व्यक्ती रुममध्ये बेशुद्धावस्थेत असल्याचं सांगितलं. पोलिसांच्या माहितीनुसार मृत व्यक्तीचं नाव संजय कुमार रामजीभाई तिवारी, वय 42 वर्षे असं असून, त्याच्याविषयीची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं त्याला जेजे रुग्णालयात नेलं, पण तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. तिवारी होता त्याच रुममध्ये त्यांच्यासोबत 14 वर्षीय अल्पवयीन मुलगीसुद्धा होती असं तपासातून समोर आलं.
तिवारीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला असता त्यानं या मुलीवर अत्याचार केल्याचे आरोप समोर आले. मुलीच्या पालकांच्या जबाबानंतर पोलिसांनी Bombay Nursing and Sanitization (BNS) Act आणि पोक्सो कायद्याअंतर्गत त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली. तर, मुंबईतील डी बी मार्ग पोलीस स्थानकात अपघाती मृत्यूची नोंद करत भारतीय दंडसंविधानाच्या कलम 137(2), 64(1), 65(1), 336(2), 336(3) आणि 340(2) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
पोलीस तपासात मिळाली काही औषधं...
पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार तिवारी आणि अल्पवयीन मुलगी असणाऱ्या हॉटेलच्या रुममधून काही औषधं ताब्यात घेण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार तिवारीनं अती प्रमाणात ही औषधं घेतल्याचा तर्कही वर्तवला जात असल्यानं तपास यंत्रणाही चक्रावली. दरम्यान, सध्या मृत व्यक्तीच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असून, या इसमानं औषधांचं सेवन खरंच केलं होतं का? याची माहिती समोर येऊ शकणार आहे.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : गुलाबी थंडीला सुरुवात होते तोच उष्णतेनं केला खेळखंडोबा; 'इथं' तापमान अधिक त्रासदायक
धक्कादायक बाब म्हणजे, तिवारी त्या अल्पवयीन मुलीसह तिच्या कुटुंबीयांच्या परिचयाचा असून, त्यानं या मुलीला फिरवण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं. 2 नोव्हेंबरला या व्यक्तीनं दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास त्या मुलीला मुंबईकत आणलं आणि त्यानं बनावट ओळखपत्र दाखवत ही आपलीच मुलगी असल्याचं सांगत हॉटेल सुपर इथं रुम घेतल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली.