Mumbai News : ट्रेन, बस, कारला प्रवेशबंदी.... मग मुंबईत का बांधले आहेत 100 किमी अंतराचे बोगदे?
Mumbai Tunnels: मुंबईत तयार होतंय आणखी एक जाळं. बोगद्यांच्या या जाळ्याचा कोणाला होणार थेट फायदा? जाणून घ्या पालिकेचा प्लॅन काय...
Mumbai Tunnels: मुंबईत मागील काही वर्षांमध्ये असंख्य बदल झाले असून, या बदलांचे थेट परिणाम शहरावर आणि शहराच्या सर्वांगीण विकासावरही होताना दिसत आहेत. अशा या मुंबई शहरामध्ये देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलासमवेत सर्वात मोठ्या सागरी किनारा मार्गाची निर्मितीही झाली आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं मुंबईतील प्रवास सुकर होत असून, येत्या काळात आणखीही काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प या शहराची शोभा वाढवताना दिसतील. अशा या शहरात 100 किमी अंतरामध्ये काही बोगदे बांधण्यात आले आहेत.
शहराच्या उदरात हे बोगदे नेमके कशासाठी आहेत माहितीये? तुम्हाला जर असं वाटत असेल की, हा एखादा वाहतूक मार्ग असावा.... तर तसं नाहीय. मुंबई शहराच्या उदरातून निघालेल्या या भुयारी मार्गानं कोणतंही वाहन, ट्रेन किंवा माणसांची ये- जा नसते. मग हा इतका खटाटोप का? का बांधण्यात आला आहे हा बोगदा?
डाणून आश्चर्य वाटेल, पण शहराच्या पोटातून जाणाऱ्या या बोगद्यांमधून पाण्याची ने-आण केली जाते. उपलब्ध माहितीनुसार सध्याच्या घडीला मुंबईमध्ये या भूमिगत बोगद्यांची संख्या वाढली असून, हे जाळं 100 किमी अंतर व्यापताना दिसत आहे.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : आठवड्याची सुरुवात दमदार पावसानं; पाहा कोणत्या भागावर मान्सूनची कृपा, अन् कुठे देणार दणका
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या कामामुळं आता (BMC) मुंबई जगातील असं दुसरं शहर ठरलं आहे, जिथं पाणीपुरवठ्यासाठी सर्वाधिक बोगद्यांचा वापर केला जातो. या यादीत पहिल्या स्थानी आहे न्यूयॉर्क शहर. इथं डेलावेयर एक्वाडक्ट नावाच्या बोगद्याचं अंतर 169 किमी इतकं असून, न्यूयॉर्क शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोगद्यांमध्ये तो सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसतो.
मुंबईत कुठे आहेत हे पाणी वाहून नेणारे भूमिगत बोगदे?
अमर महल ते परळ व्हाया वडाळा अशा टप्प्यात साधारण 9.7 किमी अंतराच्या बोगद्याचं खोदकाम पूर्ण करत नुकताच पालिकेनं या बोगद्यांच्या जाळ्याचा विक्रमी आकडा गाठला. काही दिवसांपूर्वीच पालिकेनं वडाळा आणि परळ येथील 5.25 किमी इतक्या अंतराच्या पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्याची खोदकाम पूर्ण केलं होतं. यापूर्वी हेगडेवार उद्यान ते प्रतीक्षा नगरपर्यंतचा 4.3 किमी अंतराचा टप्पा 2022 च्याच ऑगस्ट महिन्यात पूर्ण झाला होता. 2021 च्या ऑक्टोबर महिन्यात हे काम हाती घेण्यात आलं होतं.
शहराला कसा होणार फायदा?
आतापर्यंत 74 टक्के पूर्णत्वास गेलेल्या मुंबईतील या पाण्याच्या बोगद्यांचं एकूण काम आणि त्यांचं जाळं पाहता शहरासाठी 2026 पासून ते कार्यान्वित केले जाण्याची शक्यता आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर माटुंगा, परळ, चेंबूर, कुर्ला आणि भायखळ्यासह दक्षिण मुंबई, मध्य मुंबई या भागातील पाणी प्रवाहाचा दाब आणि पाणीपुरवठा यामध्ये सकारात्मक बदल होणार असल्याचं म्हटलं जडात आहे. परिणामी या भागांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मुंबईकरांना पालिकेच्या या निर्णयाचा फायगा मिळणार आहे.
मुंबईत तयार केल्या जाणाय़ऱ्या या बोगद्यांची खोली 100 ते 110 मीटर इतकी असल्याचं सांगितलं जात आहे. या बोगद्याचा बाह्य व्यास 3.2 मीटर आणि अंतर्गत व्यास 2.5 मीटर इतका असल्याचं म्हटलं जडात आहे. या बोगद्याला प्रोटेक्टीव्ह काँक्रीट लायनिंगही असल्याचं सांगण्यात येत आहे.