Mumbai Water : मुंबईत `पाणीबाणी`? धरणात फक्त दोन महिने पुरेल एवढाच साठा
Mumbai Water : मार्च महिना सरायला अवघ्ये काही दिवस असताना मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. अजून खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात झाली नसली तरी मुंबईकरांवर पाणीबाणी ओढवण्याची शक्यता आहे. कारण धरणांचा पाणीसाठ्यात कमालीची घसरण झाली आहे.
Mumbai Water : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 धरणांमध्ये फक्त दोन महिने पूरेल एवढंच पाणीसाठी उपलब्ध आहे. या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने खालावला असून तो 32.32 टक्क्यांपर्यंत खाली उतरलाय. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वात कमी नीचांक असून मुंबईकरांवर पाणीबाणीचं संकट ओढवू शकतं. धरण परिसरात पाऊस होण्यापर्यंत म्हणजे पुढील चार महिने मुंबईकरांना पाणी साठा पुरवण्याच खडतर आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे. (mumbai news Water crisis in Mumbai The stock in the 7 dams is only enough for two months)
उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात 32 टक्के म्हणजे 4 लाख 67 हजार 766 दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा उपलब्ध आहे. मुंबई महापालिकेचा पाणी विभागाच्या नियोजनानुसार एक टक्का पाणी हे मुंबईकरांना तीन दिवस चालतं. पण उन्हाळा सुरु झाल्यानंतर मुंबई पालिकेचे नियोदजनाचे गणित फुसकटणार.
मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी मुंबई पालिकेने राज्य सरकारला राखील साठ्यातून पाणी मिळवण्यासाठी पत्र लिहिलं होतं. मार्च महिन्याच्या सुरुवातीला हा पाणीसाठी 42 टक्के होता. भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठ्यातील पाणी हे मुंबईकरांना गरज पडल्यास वापरलं जाईल असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
धरणांतील पाणीसाठा
वर्ष पाणीसाठा (दशलक्ष लिटर) टक्केवारी
25 मार्च 24 4,67,766 31.32%
25 मार्च 23 5,63,181 38.91%
25 मार्च 22 6,06,741 41.92 %