बागेश्री कानडे, झी २४ तास, मुंबई : वातावरण बदलाचा थोडा चांगला परिणाम यंदा मुंबईकरांना अनुभवायला मिळालाय. ढगाळ वातावरणामुळे यावर्षी मुंबईकरांची 'ऑक्टोबर हीट'पासून सुटका झालीय. यंदा साधारणत: ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात मान्सून कायम होता. दरवर्षी मान्सून ३० सप्टेंबरपर्यंत परततो. परंतु, यंदा मात्र ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी मान्सून पूर्णपणे परतला. याच काळात फक्त एक आठवडा म्हणजेच १२ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबरपर्यंत जास्तीत जास्त तपमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं, अशी माहिती हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९ तारखेचं जास्तीत जास्त तपमान ३६ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. पण लगेचच एका दिवसानंतर तपमानात घट झाली. १९ नंतर 'क्यार' चक्रीवादळाची निर्मिती होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ढगाळ वातावरण आणि पाऊसाची रिमझिम सुरू झाली. २१ नोव्हेंबरला तापमानात घट होत तापमान २६.७ अंशांपर्यंत खाली आले. त्यानंतर २७ ऑक्टोबरलाच सूर्याचं दर्शन झालं.


मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात जास्तीत जास्त तपमान ३५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं होतं पण यावर्षी आत्तापर्यंत फक्त एकच दिवस १५ ऑक्टोबर रोजी जास्तीत जास्त ३६.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं.


गेल्या काही वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यातील तपमानाच्या आकडेवारीही एक नजर टाकुया


किमान तपमान


२०१३ - ३० अंश सेल्सिअस


२०१४ - २९ अंश सेल्सिअस


२०१५ - ३१.८ अंश सेल्सिअस


२०१६ - २६.६ अंश सेल्सिअस


२०१७ - ३६.६ अंश सेल्सिअस


२०१८ - ३८ अंश सेल्सिअस


कमाल तपमान


२०१३ - ३६ अंश सेल्सिअस


२०१४ - ३७.२ अंश सेल्सिअस


२०१५ - ३८.६ अंश सेल्सिअस


२०१६ - ३५.५ अंश सेल्सिअस


२०१७ - ३६.५ अंश सेल्सिअस


२०१८ - ३८ अंश सेल्सिअस



आता, 'क्यार' वादळ मुंबईच्या किनारपट्टीवरून लांब गेले आहे. पण आता अरबीसमुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. तरीदेखील मुंबईत पाऊस पडणार नाही. याचं कारण म्हणजे, नव्यानं तयार होणारा कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राच्या किनारपट्टीपेक्षा लांब आहे. पण, पाऊस नसला तरी मुंबईतलं ढगाळ वातावरण राहणार आहे. तपमान कमी असलं तरी वातावरणात आद्रता जास्त आहे.