दीड तासांचे अंतर 20 मिनिटांत कापता येणार; मुंबईतील `या` महत्त्वाच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर
Mumbai News Today: मुंबईकरांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी प्रशासनाकडून रस्ते, उड्डाणपुल आणि मेट्रोचे जाळे परसवण्यात येत आहेत.
Mumbai News Today: ईस्टर्न फ्रीवे कोस्टल रोडला थेट जोडण्यासाठी प्रशासनाने ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह प्रकल्प सुरू करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबईच्या एका भागातून वाहन विनाथांबा दुसऱ्या भागात पोहोचणार आहेत. यामुळं वेळेची बचतदेखील होणार आहे. या प्रकल्पाच्या भू-तांत्रिक तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. 9.23 किमी लांबीच्या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी एकूण 35 ठिकाणी भू-तांत्रिक तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने दिलेल्या माहितीनुसार, 35 ठिकाणांपैकी 7 जागी भू-तांत्रिक तपासणीचे काम पूर्ण केले आहे. या तपासणींतर्गंत जमीमीचा पृष्ठभागापासून खाली किती खडक आहे, पाण्याची पातळी किती आहे, माती कशी आहे, पाया बांधण्यासाठी किती खोल खोदकाम करावे लागेल, याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह प्रकल्पाची जबाबदारी लार्सन अँड टुब्रो कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. कंपनीने मान्सून मुंबईत पोहोचण्याआधी कामाची सुरुवात केली आहे. आगामी काही दिवसांत सर्व जागांवर भू-तांत्रिक तपासणीचे काम पूर्ण करण्याची योजना बनवली आहे. जेणेकरुन मान्सून संपताच प्रकल्पाचे काम सुरू केले जाऊ शकते.
काय आहे प्रकल्प?
दक्षिण मुंबईतून वाहनांना उपनगरांपर्यंत सिग्नल फ्री मार्ग उपलब्ध करण्यासाठी 9.23 किमी लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. 9.23 किमी मार्गावरील 6.23 किमी मार्ग भुयारी असणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्व द्रुतगती मार्ग थेट कोस्टल रोडला जोडला जाणार आहे. हा मार्ग पी डिमेलो रोडवर असलेल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्हजवळ असलेल्या कोस्टल रोडपर्यंत असणार आहे. या प्रकल्पासाठी 7,765 कोटींचा खर्च होणार आहे. 6.51 किमी लांबीच्या बोगदा टर्नल बोरिंग मशीच्या सहाय्याने होणार आहे. टनलचा व्यास 11 मीटर इतका असणार आहे. तसंच, बोगद्यात 2-2 लेन असणार आहेत. आप्तकालीन स्थितीत बोगद्यात 1-1 लेनचा अतिरिक्त मार्ग तयार केला जाणार आहे.
प्रकल्पाचा फायदा काय?
हा प्रकल्प तयार झाल्यानंतर ठाणे, कल्याण, भिवंडी, चेंबूरहून दक्षिण मुंबई किंवा उपनगराच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना सिग्नल न लागता विना थांबा मार्ग उपलब्ध होणार आहे. पूर्व द्रुतगती मार्ग चेंबूर इंडियन ऑइलच्या जवळून सुरू होतो आणि सीएसएमटीच्या जवळ पी डिमेलो मार्गावर संपतो. तर, कोस्टल रोड मरीन ड्राइव्ह ते मीरा भाईंदर दरम्यान तयार होतोय. 9.23 किमी लांबीचा हा मार्ग तयार झाल्यानंतर हे दोन प्रकल्प एकमेकांना जोडले जाणार आहेत.
प्रकल्पाचे वैशिष्ट्यै काय?
- एकूण लांबी 9.23 किमी इतकी
- 6.51 किमी मार्ग भुयारी असणार
- बोगद्याचा व्यास 11 मीटर असणार आहे
- 2-2 लेन
-1-1 आपातकालीन मार्ग
- जमीनीपासून 40 मीटर खोल
- मेट्रो कॉरिडोरच्या खाली असणार बोगदा