मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली १ फेब्रुवारीला मोदी सरकारचा चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण, त्याआधीच मुंबईकरांवर महागाईची कुऱ्हाड कोसळलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत पेट्रोलचे दर ८१ रुपयांवर जाऊन पोहचले आहेत... तर मुंबई महापालिकेच्या रुग्णसेवेच्या दरात सुमारे ३० टक्के वाढीच्या प्रस्तावाला कालच मंजुरी देण्यात आलीय. 


बेस्टचा प्रवासही येत्या काही दिवसात महागण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी नव्या वर्षाची सुरूवात महगाडी ठरतेय.