Mumbai Railway Stations News In Marathi: मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे असे म्हणतात आणि खरोखरच यात काहीच वावगं नाही. लाखो लोकांना रोज अगदी कमीत कमी खर्चात प्रवासाची संधी उपलब्ध करुन देत लोकलने आपले पैचे, वेळ दोन्ही वाचवले आहेत. याच मुंबईकरांचा प्रवास आणखीन सोयीस्कर व्हावे यासाठी रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अमृत ​​भारत स्थानक योजनेअंतर्गत मुंबईतील 19 उपनगरीय रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. हा कार्यक्रम दिल्लीत रिमोट व्ह्यूइंग सिस्टमद्वारे सुरू केला जाईल. यामध्ये मध्य रेल्वेच्या 12 आणि पश्चिम रेल्वेच्या 8 स्थानकांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृत ​​भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील एकूण 1,309 रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे.  या स्थानकांचे आधुनिक सुविधांसह जागतिक दर्जाच्या टर्मिनसमध्ये रूपांतरित केले जाईल. कार्यक्रमस्थळी अत्याधुनिक, आरामदायी आणि उच्च प्रतिष्ठेच्या सुविधा पुरविल्या जातील. आगामी अर्थसंकल्पात राज्यासाठी 15,554 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून अमृत भारत स्थान योजनेंतर्गत 56 ठिकाणे जागतिक दर्जाप्रमाणे विकसित करण्यात येणार आहेत.


या स्थानकांचा होणार कायापालट


या 56 रेल्वे स्थानकांपैकी 12 स्थानके मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात समावेश असून भायखळा, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा आणि इगतपुरी या स्थानकांचा कायापालट होणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परळ, प्रभादेवी, जोगेश्वरी, मालाड आणि पालघर या स्थानकांचा कायापालट होणार आहे. 


यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 फेब्रुवारी रोजी 1,500 विमानतळांचे उद्घाटन करतील आणि अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 554 विमानतळांच्या विकासाचे उद्घाटन करतील. अमृत ​​भारत स्थानक योजनेच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय स्थानकाला दिलासा मिळणार आहे. तसेच पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


रेल्वे स्थानकातील पुनर्विकासाठी खर्च


मध्य रेल्वे : इगतपुरी 12.53 कोटी, टिटवाळा 25,05 कोटी, शहाड 8.39 कोटी, दिवा 45.09 कोटी, मुंब्रा 14.61 कोटी, विद्याविहार 32.78 कोटी , कुर्ला 21.81 कोटी, माटुंगा 17.28 कोटी, वडाळा रोड 23.02 कोटी, चिंचपोकळी 11.81 कोटी, सैंडहर्स्ट रोड16.37 कोटी, भायखळा 35.25 कोटी    
पश्चिम रेल्वे:  मरीन लाइन्स 28 कोटी, चर्नी रोड 23 कोटी, ग्रँट रोड 28 कोटी , लोवर परेल 30 कोटी , प्रभादेवी 21 कोटी , जोगेश्वरी 50 कोटी, मालाड 35 कोटी , पालघर 18 कोटी