मुंबई : मुंबईला काल मुसळधार पावसानं झोडपून काढलं. यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं होते. लोकं पाण्यातून रस्ता काढत चालले होते. यावेळी पुरातून पोलीस स्टेशनही सुटली नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साकीनाका आणि भायखळ्याच्या पोलीस ठाण्यांमध्ये रात्रभर पाण्यात बसूनच पोलिसांना काम करावं लागलं. थोड्या सखल भागात असलेल्या साकीनाका पोलीस स्टेशनात गुडघ्यापर्यंत पाणी होतं...


भायखळा पोलीस स्टेशनजवळ ड्रेनज ओव्हरफ्लो झाल्यानं पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरलं. संध्याकाळी ६-७ वाजल्याच्या दरम्यान भायखळा पोलीस स्टेशनमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी होतं... 


रात्री उशीरा पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पोलीस स्टेशन मधील पाणी कमी झालं. अखेर पाणी उपसून काढावं लागलं.