Crime News: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एटीममध्ये चोरी करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. हे चोर एटीएममध्ये (ATM) स्टीलची पट्टी लवून लाखो रुपयांची चोरी करायचे. पोलिसांनी याप्रकरणी ठाण्यातून (Thane) दोघांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी एटीएममधील सीसीटीव्हीत कैद झाले होते. पोलिसांनी या फोटोंच्या आधारेच आरोपींना अटक केली आहे. बोरिवलीत (Borivali) ही चोरीची घटना घडली होती. 


नेमके चोरी कसे करायचे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीसीटीव्हीत चोर एटीएममधून पैसे काढत असून नंतर जिथून पैसे बाहेर येतात तिथे एक पट्टी चिकटवताना दिसत आहेत. ही पट्टी चिकटवल्यानंर दोन्ही आरोपी बाहेर जाताना दिसत आहेत. 


हे तेच आरोपी आहेत ज्यांनी 5 मार्चला एका व्यक्तीचा 20 हजार रुपयांचा गंडा घातला होता. पीडित व्यक्तीने पोलिसांना याची माहिती दिली होती. पोलिसांनी वेगवेगळ्या एटीएमची पडताळणी केली असता, त्यांना एका एटीएमच्या सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींची माहिती मिळाली. पोलिसांनी सुगावाच्या आधारे कळवा येथून आरोपी धीरेंद्र पाल आणि अभिषेक यादव यांना अटक केली. दोन्हीही आरोी उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. 


डीसीपी अजय बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपींची चौकशी केली असता माहिती मिळाली की, जेव्हा एखादी व्यक्ती एटीएममधून पैसे काढण्यासाठी येत असे तेव्हा त्याआधीच आरोप पैसे येतात त्या ठिकाणी एक स्टीलची पट्टी चिकटवत असत. जेव्हा एटीएमधारक मशीनमध्ये कार्ड स्वाइप केल्यानंतर पिन टाकून पैसे येण्याची वाट पाहत असे तेव्हा स्टीलची पट्टी लागलेली असल्याने पैसे बाहेर येत नसत. अखेर कंटाळून ती व्यक्ती गेल्यानंतर दोन्ही आरोपी एमटीएम मशीनमधून पट्टी हटवत ते पैसे काढून घ्यायचे".


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. दोन महिन्यांसाठी ते मुंबईत येत असतं आणि एटीएममध्ये चोरी करत पुन्हा उत्तर प्रदेशला पळून जात. दोन्ही आरोपींविरोधात मुंबई आणि नवी मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 25 फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस या सर्व प्रकरणांचा तपास करत आहेत. पोलिसांना सध्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.