मुंबई : मुंबईकरांनो सावधान व्हा...बरं नसल्यावर लगेच तुम्ही डॉक्टरकडे जात असाल तर त्याची डिग्री आता तपासून घ्या. कारण, मुंबईत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालाय. मुंबई पोलिसांनी गोरेगाव परिसरातून काही बोगस डॉक्टरांना अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोरेगावच्या प्रेमनगरमध्ये डोंगरी परिसरात धाड टाकून पाच क्लिनिकवर छापा टाकलाय. यामध्ये 4 बोगस डॉक्टरांसोबत एका कंपाऊंडरला अटक करण्यात आली आहे.  


अटक करण्यात आलेले हे बोगस डॉक्टर कोणतंही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना क्लिनिक चालवत होते. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून सर्वेश यादव, छोटेलाल यादव, ओम यादव आणि सपना यादव यांना अटक केलीये. 



दरम्यान मुंबई पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय साठा जप्त केलाय. या बोगस डॉक्टरांचे आणखी काही साथीदार आहेत का...? याचा तपास मुंबई गुन्हे शाखा करत आहेत.


दरम्यान काही दिवसांपूर्वी मालाडमधून एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रांचने कुरार गावातील गांधी नगर परिसरातून या बोगस डॉक्टरला अटक केली होती. आजूबाजूच्या लोकांच्या तक्रारीनंतर महापालिका आणि पोलिसांनी कारवाई केली होती.