पाकिस्तान लपून बसलेल्या डॉन दाऊदला मोठा झटका, गँगस्टर एजाज लकडावालाला अटक
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याचा खास आणि जवळचा गँगस्टर एजाज लकडावाला (Ejaz Lakdawala) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई : अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी जेरबंद केले आहे. पाटण्यात मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मुलीसह लकडावाला याला पाटण्यात अटक केली. अंडरवर्ल्डविरोधात मुंबई पोलिसांना हे मोठे यश मिळाले आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) गुन्हे शाखेने पाकिस्तानात (Pakistan) लपून बसलेल्या डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याचा खास आणि जवळचा गँगस्टर एजाज लकडावाला (Ejaz Lakdawala) याला अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने बिहारमधील पाटना येथून लकडावाला ताब्यात घेतले. मुंबई पोलीस गुन्हे शाखेला हे यश मिळण्यामागे त्याच्या मुलीला अटक केल्यानंतर माहिती मिळाली.
एजाज लकडावाला गेल्या २० वर्षांपासून फरार होता. २१ जानेवारीपर्यंत एजाज लकडावालाची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.. तब्बल ४० हून अधिक खंडणीचे गुन्हे आणि हत्येच्या आरोपांखाली लकडावाला पोलिसांना हवा होता. मुंबई आणि दिल्ली पोलीस त्याच्या मागावर होते.
दाऊद इब्राहिमच्या टोळीत असलेला लकडावाला कालांतराने छोटा राजनच्या गॅंगमध्ये शिरला. मात्र २००३ मध्ये बँकॉकमध्ये छोटा राजनवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर एजाज लकडावालावर डी गॅंगला माहिती पुरवल्याचा संशय छोटा राजनला आला आणि त्यांच्यात दुश्मनी आली.
एजाज लकडावाला पाटण्यात असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाला मिळाल्यानंतर पटणा पोलिसांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी सांगितलं.