कृष्णात पाटील, मुंबई : मुंबई पोलिसांना केवळ ट्रोलिंगच नव्हे तर सोशल मीडियावरून शिविगाळही केली गेली अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली नाही. मुंबई पोलिसांना बदनाम केले जात होते. एका ठराविक हेतूने हे कॅम्पेन चालवले जात होते. अनेक फेक अकाऊंटची ओळख पटलेली आहे. हे कोण चालवत होते, त्यामागे कोण होते. याचा तपास सुरू आहे. हजारोंच्या संख्येनं ही फेक अकाउंट असल्यांचं परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाबाहेरून काही अकाऊंट असण्याची शक्यता आहे. कोवीड युद्ध लढत असताना मुंबई पोलिसांचे नाव खराब करण्यासाठी हे षडयंत्र कुणी रचले हे समजत नाही. यामागे वेस्टेड इंटरेस्टेड आहे. सुशांत सिंह यांच्या बहिणीवर दाखल असलेला प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे दिल्याचा एफआयआर त्याच दिवशी सीबीआयकडे ट्रान्सफर केला होता. असं देखील मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटले आहे.द


त्याआधी राज्याचे गृहमंत्री यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. त्यांनी म्हटलं की, AIMS आणि मुंबई स्थानिक रुग्णालयाचे रिपोर्ट बघितले तर त्यामध्ये वेगळं काही आढळलं नाही. CBI तपास सुरू आहे, त्यांनी लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर केला तर सुशांत सिंह प्रकरणमधील तथ्य बाहेर येईल.


'मिशिगन विद्यापीठ, अमेरिका यांनी एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे की, सुशांत सिंह प्रकरण हे हाईप करण्यात आले आहे. राजकीय पक्ष, काही प्रसारमाध्यमे यांनी हे प्रकरण हाईप केलं आहे. यानिमिताने महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम भाजपने केलं. मुंबई पोलिसांनी सुद्धा तपास योग्य केला आहे असं SC ने म्हटलं आहे. ज्यांनी 5 वर्षाचे नेतृत्व केलं ते फडणवीस यांनीही मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता असं म्हंटलं आहे.' 


'पोलिसांना बदनाम करण्याचे प्रयत्न ज्यांनी केले त्यांनी राज्याची माफी मागितला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. बिहारचे पोलीस प्रमुख जे होते ते आता निवडणूक लढवत आहे, फडणवीस हे निवडणूक प्रभारी आहेत. माझा प्रश्न आहे की फडणवीस हे या अधिकाऱ्याच्या निवडणूक प्रचाराला जाणार का ?.'असा प्रश्न देखील अनिल देशमुख यांनी केला आहे.