मुंबईत एका विहिरीत सापडले सोन्या-चांदींचे दागिने
मुंबई पोलिसांना एक अशा सोन्या चांदीची विहीर सापडली आहे जेथे एका गँगचे लोकं सोनं चांदी लपवून ठेवत होते. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी विहीर साफ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जे समोर आलं ते पाहुन सर्वांच्याच भूवया उंचावल्या.
मुंबई : मुंबई पोलिसांना एक अशा सोन्या चांदीची विहीर सापडली आहे जेथे एका गँगचे लोकं सोनं चांदी लपवून ठेवत होते. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी विहीर साफ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जे समोर आलं ते पाहुन सर्वांच्याच भूवया उंचावल्या.
कुरार येथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. २१ ऑक्टोबर रोजी एका मोबाईल शॉपमध्ये चोरी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी 25 ऑक्टोबर 2017 रोजी मनोज पटेल, जय कुमार आणि आणखी एकाला अटक केली होती.
पोलीस तपासणी दरम्यान, दोन्ही चोरांनी एक विहीर बद्दल सांगितले. त्यानंतर, पोलिसांनी स्थानिकांची मदत घेऊन पाणी बाहेर काढलं आणि मग विहिरीमध्ये खोदकाम सुरु केलं.
विहिरीच्या खोदकामात पोलिसांच्या हाती एक प्लॅस्टिक बॅग सापडली. ज्यात लाखों सोने आणि चांदी होती. हे पाहून सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला.