भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना मुंबई पोलिसांची नोटीस; दिशा सालीयान प्रकरणी अडचणीत
Disha salian case : दिशा सालीयानची आत्महत्या नसून सामुहिक बलात्कार असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्र्यांना भोवणार?
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजपचे आमदार नितेश राणे यांना मालवणी पोलिस स्टेशनने चौकशीसाठी हजर रहाण्यासाठी नोटीस बजावली आहे.
दिशा सालीयानची आत्महत्या नसून सामुहिक बलात्कार असल्याचे वक्तव्य नारायण राणे आणि नितेश राणे यांनी केले होते. नारायण राणे यांना 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मालवणी पोलिस स्टेशनमध्ये चौकशीला हजर रहाण्याची नोटीस मालवणी पोलिसांनी बजावली आहे.
तर नितेश राणे यांना 3 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मालवणी पोलिस स्टेशनमध्ये चौकशीला हजर रहाण्याची नोटीस बजावली आहे. दिशा सालीयान यांच्या आई वसंती सालीयान यांच्या तक्रारीवरून मालवणी पेलिसांन या दोन्ही नोटीस नारायण राणे आणि नितेश राणे यांना बजावल्या आहेत.
दिशा सालीयान यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मृत्यू संदर्भात ती आत्महत्या नसून सामुहिक बलात्कार करून खून झाल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पत्रकार परीषदेत जाहीररीत्या सांगितलं होतं.
त्यामुळे संतप्त झालेल्या दिशा सालीयान यांच्या पालकांनी आधी महिला आयोग आणि त्यानंतर मालवणी पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.